शिरूरनामा न्यूज नेटवर्क
विधायकायक कामाला आकार देऊन आपला व आपल्या कुटुंबियांतील सदस्यांचा वाढदिवस साजरा करणे काळाची गरज आहे.अशा विधायक कामाची विधायकता समजून त्याची अंमलबजावणी करणाऱ्या मंडळींची संख्या मर्यादित असलीतरी ती समाजातील एक प्रकारची सकारात्मकता आहे.आज आपला देश कोविड सारख्या महामारीच्या विळख्यात अडकला आहे.अशा परिस्थितीत धूमधडाक्यात वाढदिवस साजरा करण्याऐवजी जिथे गरज आहे तिथे मदतीचा हात देणे अपेक्षित आहे.येथील क्रिशा होंडा चे संचालक किरण पठारे यांनी याच जाणिवेतून आपली कन्या क्रिशा हीचा वाढदिवस शहरातील कोविड केअर सेंटरमधील रुग्ण, आरोग्य कर्मचारी तसेच डॉक्टरांना आमरसाचे जेवण देऊन साजरा केला.आजच्या संकटमय वातावरणात पठारे यांनी दाखवलेले सामाजिक औदार्य हे निश्चितच इतरांना प्रेरणा देणारे आहे.समाजाप्रती आपली संवेदना जागृत ठेवून शक्य होईल तेवढी सामाजिक बांधिलकी राखण्याचा आपले वडिल माऊली पठारे यांचा वारसा किरण व त्यांचे सर्व बंधू प्रामाणिकपणे जोपासत आहेत.