नवी दिल्ली : सोशल मीडिया कंपनी फेसबुकनं (Facebook) फेसबुकनं रिलायन्ससोबत मोठा व्यवहार केला आहे. उद्योगपती मुकेश अंबानी (Mukesh Ambani) यांची कंपनी रिलायन्स इंडस्ट्रीज लिमिटेडच्या रिलायन्स जिओ (Reliance Jio) मध्ये फेसबुकनं 5.7 बिलियन म्हणजे 43,574 कोटी रुपयांची गुंतवणूक केली आहे. या कारारानंतर उद्योगपती मुकेश अंबानी आशियातील सर्वात श्रीमंत व्यक्ती बनले आहे. त्यांनी चीनमधील अलीबाबाचे संस्थापक जॅक मा या मागे टाकलं आहे.