जनतेला हवा आमदार नवा; शिरूर हवेलीची बदलली हवा

0

शिरूरनामा न्यूज नेटवर्क      

शिरूर:महाबिकास आघाडी आणि महायुतीला शिरूर हवेली मतदारसंघात मिळणाऱ्या प्रतिसादाचे अवलोकन केले असता,महायुतीने यात मोठी आघाडी घेतल्याचे चित्र आहे.नवीन आमदार हवा म्हणजेच आता बदल हवा अशा स्वरूपाचा सुर सर्वत्रच पहावयास मिळत आहे.
         शिरूर हवेली मतदारसंघातील आजची परिस्थिती पाहता, सगळीकडे महायुतीचे उमेदवार माऊली कटके यांचा डंका वाजताना दिसत आहे.विद्यमान आमदाराला त्यांच्या पक्षाने तीन वेळा संधी दिली यात ते एक वेळा अपयशी दोन वेळा विजयी ठरले आहेत.एकूणच जेवढी संधी त्यांना मिळायला हवी तेवढी त्यांना मिळाली असल्याने आता नवीन चेहऱ्याला संधी मिळायला हवी असा मतदारांचा सुर आहे. रावसाहेब दादा घोडगंगा सहकारी साखर कारखाना बंद पडला असला तरी त्यांच्याकडे खासगी कारखाना आहे. जिल्हा बँकेचे संचालकपदही त्यांच्याकडे आहे.यामुळे तरुणांना संधी या दृष्टिकोनातून नवीन व्यक्तीला संधी मिळायला हवी असाही सूर आहे.या आधीच्या चार पंचवार्षिक निवडणुकांमध्ये गावागावात उमेदवार आल्यानंतर मोठ्या प्रमाणावर महिला कधीच समोर येताना दिसल्या नाहीत.या वेळी मात्र कटके जिथे जात आहेत तिथे महिलांची संख्या लक्षणीय दिसत आहे.कदाचित हा लाडकी बहीण योजनेचा परिणाम असावा.महायुतीचे घटक सर्वत्र कार्यरत असावेत.मात्र ही निवडणूक जनतेनेच हातात घेतल्याचे चित्र जाणवत आहे.कटके यांना शिरूर आणि हवेली या दोन्ही भागातून सारखाच प्रतिसाद मिळताना दिसत आहे.धार्मिक सहलीमुळे कटके यांचा चेहरा गावा गावात परिचित झाला असल्याचा फायदा त्यांना मिळताना दिसत आहे.
              शिरूर हवेली मतदार संघाची एकूण मतदारसंख्या चार लाख ५९ हजार ६९३ (यात वाढ झाली असावी) इतकी आहे.यात २ लाख २० हजार ५४२ महिला मतदार तर २ लाख ३८ हजार ८७४ पुरुष मतदार व इतर १३ मतदार आहेत.मागील काही निवडणुकांचा अनुभव पाहता,महिला मतदारांचा मतदान करण्याचा टक्का पुरुषांपेक्षा कमी राहिलेला दिसतो.यावेळी मात्र महिला मतदानास फार उत्सुक असल्याचे जाणवते. महिलांच्या मतदानाचा टक्का वाढल्यास तो महायुतीस फायदेशीर ठरू शकतो.युवा वर्गही कटके यांच्याकडे आकृष्ट झाल्याचे निदर्शनास येत आहे.नव्याने नोंद झालेल्या या युवा मतदारांनी उत्स्फूर्त मतदान केल्यास त्याचाही कटके यांना फायदा मिळू शकतो.एकूणच शिरूर हवेली मतदार संघात बदलाचे वारे वाहू लागल्याचे वास्तव दिसून येत आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.