शिरूरनामा न्यूज नेटवर्क
शिरूर: शिरूर हवेली मतदारसंघात ग्रामीण भागात महायुतीचे उमेदवार माऊली कटके विरुद्ध महाविकास आघाडीचे उमेदवार अशोक पवार ही लढत चुरशीची आहे.मात्र एकीकडे कटके यांना जास्त प्रतिसाद मिळत असताना महाविकास आघाडीच्या अशोक पवार यांच्या विरोधात वाबळेवाडी ग्रामस्थ प्रचार करीत आहेत.एका गावात त्यांना विरोधास सामोरे जावे लागले.यामुळे माऊली नामाचाच गजर घुमेल अशी जनता म्हणू लागली आहे.
सुरुवातीला महाविकास आघाडीचे उमेदवार अशोक पवार यांचे विरोधात सक्षम उमेदवाराच नाही. अशी चर्चा होती.मात्र कटके यांच्या उमेदवारीनंतर चित्र बदलत गेले.आताचे चित्र कटके यांच्याबाबत सकारात्मक झाल्याचे दिसून येत आहे. कारण कटके यांना शिरूर हवेलीतील ग्रामीण भागात प्रचंड प्रतिसाद मिळाला.प्रचार दौऱ्या दरम्यान शिरूर हवेली मतदारसंघात प्रत्येक गावात कटके यांचे झालेले स्वागत हे निश्चितच हटके होते. त्यांचे औक्षण करण्यासाठी महिलांनी केलेली गर्दी,तरुणाईची त्यांच्या सोबत फोटो काढण्यासाठी उडालेली झुंबड आणि माऊलींच्या समर्थनार्थ दिलेल्या घोषणा हे वातावरण यापूर्वी पहावयास मिळाले नाही.या आधी उमेदवार जेव्हा गावात जायचे तेव्हा फारशी गर्दी कधी दिसून आले नाही. कटके यांच्यासाठी मात्र शेकडो लोक रस्त्यावर आलेले दिसून आले.जेव्हा मतदारांना बदल हवा असतो तेव्हा अशा स्वरूपाचे चित्र निर्माण होत असल्याचे जाणकार सांगतात.घोडगंगा कारखाना अजित पवार यांच्यामुळे सुरू होऊ शकला नाही.असे जरी आमदार पवार सांगत असेले तरी घोडगंगा प्रश्नावर ते सध्या बॅकफूटवर गेल्याचे जाणवत आहे.याचाही लाभ कटके यांना मिळतानाचे चित्र आहे.
एक दखल घेण्याजोगी गोष्ट म्हणजे,वाबळेवाडी ग्रामस्थ मोठ्या संख्येने आमदार पवार यांच्या विरोधात उतरले असून पदरमोड करून ते मतदारसंघात फिरत आहेत.एका गावात पवार त्यांना विरोधास सामोरे जावे लागले.ही बाब इलेक्ट्रॉनिक सह सोशल मीडियामध्ये व्हायरल झाली.तळेगाव ढमढेरे मध्ये त्यांच्या सभेत एकजण उसाचे टिपूर घेऊन आला आणि त्याने तेथे गोंधळ घातला.एकीकडे अशाप्रकारे पवार यांना विरोध होत असताना दुसरीकडे माउलींना लोक डोक्यावर घेत असल्याचे पहावयास मिळत आहे.शिरूर शहरात कटके यांना तुलनेने जास्त चांगला प्रतिसाद मिळाला. ठीक ठिकाणी फटाक्यांची आतषबाजी, फुलांची उधळण, घोषणा तसेच अनेक भागात महिलांकडून झालेले औक्षण यामुळे शहर माऊली मय झाल्याचे दिसून आले.या पदयात्रेवेळी एका ज्येष्ठ महिलेने माउलीची गळाभेट घेऊन आशीर्वाद दिले. यावेळी तिच्या डोळ्यात अश्रू तरळले. काही महिलांनी तर माऊली यांना श्रावण बाळाची उपमा दिली. एकूणच सर्व परिस्थिती पाहता लोकं म्हणू लागलीत.
शिरुर हवेलीत तीन नंबर बटनाचाच वाजणार बजर;कारण सगळीकडे घुमतोय माऊली नामाचाच गजर.