शिरूरनामा न्यूज नेटवर्क
शिरूर:कोलकाता येथील वैद्यकीय महाविद्यालयातील विद्यार्थिनीवर अत्याचार करून तिची क्रूरपणे हत्या करण्यात आल्याच्या निषेधार्थ उद्या इंडियन मेडिकल असोसिएशन व निमा शिरूर शाखेच्या वतीने २४ तास सेवा बंद आंदोलन करण्यात येणार आहे. याबाबतचे निवेदन तहसीलदारांना देण्यात आले.
कोलकाता येथील आर.जी. कार या महाविद्यालयातील विद्यार्थिनीवर अत्याचार करून तिचा क्रूरपणे खून करण्यात आला. या घटनेचे देशभर पडसाद उमटले.याप्रकरणी तपास यंत्रणांचा निष्काळजीपणा समोर आला.स्वातंत्र्यदिनी आंदोलक विद्यार्थ्यांवर हल्ला करून पुरावे नष्ट करण्याचे हेतूने रुग्णालयातील विविध विभागाची तोडफोड करण्यात आली.या विद्यार्थिनीला न्याय मिळण्याऐवजी गुन्हेगारांना पाठबळ देणाऱ्या प्रवृत्तीचा इंडियन मेडिकल असोसिएशन व निमाने निषेध केला असून असोसिएशनने पुकारलेल्या सेवा बंद आंदोलनात शिरूर शहरातील असोसिएशनचे सर्व सदस्य डॉक्टर उद्या (१७ ऑगस्ट) सकाळी सहा वाजल्यापासून ते परवा (१८ऑगस्ट) सकाळी सहा पर्यंत तास वैद्यकीय सेवा बंद ठेवणार आहेत.ओपीडी पूर्णपणे बंद राहणार असून तातडीच्या नसलेल्या शस्त्रक्रिया केल्या जाणार नाहीत.मात्र अत्यावश्यक सेवा मात्र सुरूच राहणार आहेत.उद्या निषेध मोर्चा काढण्यात येणार असल्याचे असोसिएशनचे शिरूर चे अध्यक्ष डॉ. देवदत्त पाटील यांनी संगितले.याबाबतचे निवेदन आज तहसीलदारांना देण्यात आले.सचिव डॉ स्वप्निल भालेकर, खजिनदार डॉ.अखिलेश राजुरकर,माजी अध्यक्ष डॉ.भाऊसाहेब पाचुंदकर डॉ.संदीप कोकरे, डॉ.आकाश सोमवंशी ,डॉ.विशाल महाजन ,डॉ.केतन गवारी,डॉ. पल्लवी सोमवंशी आदी यावेळी उपस्थित होते.