ग्रामीण रुग्णालयाच्या वैद्यकीय अधीक्षकाचा राजीनामा
राजीनामापत्र निकाली काढल्याची जिल्हा शल्यचिकित्सकाची माहिती
शिरूर:ग्रामीण रुग्णालयाचे प्रभारी वैद्यकीय अधीक्षक डॉ.तुषार पाटील यांनी आपल्या पदाचा राजीनामा दिल्याचे खात्रीलायक वृत्त आहे.सध्या फक्त एका मेडिकल ऑफिसरच्या जीवावर शिरूर ग्रामीण रुग्णालयची धुरा आहे.जिल्हा शल्यचिकित्सलयाच्या स्तरावर राजीनाम्याबाबत कार्यवाही होत नसल्याने त्यांचे राजीनामापत्र निकाली काढल्याचे जिल्हा शल्यचिकित्सक डॉ.अशोक नांदापूरकर यांनी शिरूरनामाशी बोलताना सांगितले.