शिरूर: कोरोनाचा प्रादूर्भाव रोखण्यासाठी गेली दोन महिने सर्वच प्रशासकीय यंत्रणा आपापल्या परिने ‘कोराना योध्दा’ म्हणून कार्यरत आहे. शिरूरच्या मंडलाधिकाऱ्याने तर आपले कर्तव्य बजावण्यासाठी दोन महिने घरी जाण्याचेही टाळले.त्याचा परिणाम दोन महिन्यांनी घरी गेलेल्या पप्पांशी मुलांनी कट्टी घेतली. पप्पांना मात्र आपले कुटुंब बघून गहिवरून आले.
कोरोनाचा प्रादूर्भाव रोखण्यासाठी राज्यात अजूनही लॉकडाऊन सुरूआहे.हे लॉकडाऊन,संचारबंदी नागरिकांसाठी आहे.मात्र महसूल अधिकारी,कर्मचारी, पोलिस यंत्रणा,डॉक्टर्स,परिचरिका, महानगरपलिका नगरपरिषद,ग्रामपंचायत आदि सर्वच प्रशासकीय यंत्रणा गेली दोन महिन्यांपासून कोरोनाला हद्द्पार करण्यासाठी झटताना दिसत आहेत. शिरूर तालुक्यात दोघांचा कोरोनामुळे मृत्यू झाला.चार गांवांत मिळून १७ कोरोना बाधित रुग्ण आहेत.अशा परिस्थितीत प्रांताधिकारी संजय देशमुख, तहसिलदार लैला शेख, मुख्याधिकारी महेश रोकडे,तालुका आरोग्य अधिकारी डॉ. राजेंद्र शिंदे, तीनही पोलिस ठाण्याचे निरीक्षक आदींच्या मार्गदर्शनाखाली प्रशासकीय यंत्रणा परिस्थिती नियंत्रणात ठेवण्यासाठी झटत आहेत.यात अधिकाऱ्यापासून ते अगदी सफाई कामगारापर्यंत सर्वांचेच योगदान महत्वाचे आहे.मात्र यातही शिरूरचे मंडलाधिकारी निलेश घोडके यांनी दोन महिने घरी न जाता प्रामाणिकपणे आपले कर्तव्य बजावल्याचे दिसून आले.येथील सिताबाई थिटे फार्मसी महाविद्यालय, मागासवर्गीय मुलींचे वसतीगृह,कारेगाव येथील संजीवनी होस्टेल या ठिकाणी रस्त्याने पायी जाणाऱ्या मजूरांसाठी लेबर कॅम्प सुरू करण्यात आले होते.रस्त्याने जाणाऱ्या मजुरांना थांबवणे त्यांना दिलासा देऊन त्यांना कॅम्पमध्ये दाखल करून घेणे,तेथे त्यांच्या राहण्याची व जेवणाची व्यवस्था करण्याची जबाबदारी घोडके यांच्याकडे होती.तहसिलदार लैला शेख यांनी रांजणगांव औद्योगीक वसाहतीतील कारखान्यांना लॉकडाऊनमुळे कामच नसल्याने अडचणीत आलेल्या लोकांना किराणा किट देण्याचे आवाहन केले होते.या आवाहनाला कारखान्यांनी प्रतिसाद दिला होता.घोडके यांनी या कारखान्यांशी समन्वय साधून किट लोकांपर्यंत पोहचवण्याचे काम केले.शहरातही शेकडो गरीब कुटुंबांना घोडके यांनी कीट उपलब्ध करून दिले.तलाठी विजय बेंडभर यांची घोडके यांना मोलाची साथ मिळाली.
परप्रांतीयांना त्यांच्या राज्याच्या सीमेवर सोडण्यासाठी शिरूर येथून १७० बसेस तसेच तीन ट्रेनची व्यवस्था करण्यात आली होती.यामुळे शिरूरच्या आसपासच्या तालूक्यातून परप्रांतीयांचे लोंढे शिरूरमध्ये आले.प्रांताधिकारी देशमुख,तहसिलदार शेख यांच्यासह घोडके यांनी या लोंढ्याला तोंड दिले. तर्डोबावाडी येथील मयुर लॉन्स येथे दोन दिवस या कामगारांची राहण्याची व्यवस्था करण्यात आली. त्यानंतर बस व रेल्वेद्वारे या कामगारांना रवाना करण्यात आले.यात घोडके यांनी तहसिल शेख यांच्याबरोबरच महत्वाची भुमिका बजावली.एक मध्यप्रदेशातील कुटुंब बायपासने पायी जात असताना घोडके यांनी त्यांना कॅम्पमध्ये आणले.यातील महिला गर्भवती होती.या महिलेच्या प्रसूतीसंदर्भातही घोडके यांनी त्यांना रूम्णालयात दाखल करून माणूसकी दाखवली.एकूणच घोडके यांचा नागरिकांशी थेट संपर्क येत असूनही त्यांनी न डगमगता तहसिलदार शेख यांच्या विश्वासाला पात्र ठरत आपले कर्तव्य बजावले.या सर्व व्यस्त कामात घोडके यांना दिवसभर कुटुंबाशी संपर्क साधता येत नव्हता.वेळ मिळाल्यावर ते व्हिडिओ कॉल करायचे.तेव्हा मुलांकडून एकच प्रश्न विचारला जायचा,पप्पा कधी घरी येणार?पप्पांकडे मात्र ठोस उत्तर नव्हते.त्यामुळे मुले हिरमूसून जायची.अशा अवस्थेत दोन महिन्याने घोडके यांना घरी जाण्याची संधी मिळाली.पप्पांना दारात पाहून मुले खुश झाली. मात्र त्यांनी लाडीकपणे पप्पांशी कट्टी घेतली. त्यांना मनवायला पप्पांना मात्र विशेष काही करावे लागेल.
ReplyForward
|