दीड लाखाहून अधिक भाविकांनी घेतले रामलिंगाचे दर्शन

0

शिरुरनामा न्यूज नेटवर्क

शिरूर:महाशिवरात्रीनिमित्त आयोजित रामलिंग महाराज यात्रेला भाविकांनी मोठ्या भक्तीभावाने हजेरी लावली.दीड लाखाहून अधिक भाविकांनी आज रामलिंगाचे दर्शन घेतले.

        पालखीचे पहाटे रामलिंग येथे आगमन झाल्यावर रामलिंग महाराजांना महाभिषेक करण्यात आला. भाविकांनी रात्री बारा वाजल्यापासूनच रामलिंगाच्या दर्शनासाठी रांगा लावल्या.महाशिवरात्री निमित्त आयोजित रामलिंग यात्रेसाठी रामलिंग महाराज देवस्थान ट्रस्ट व शिरूर ग्रामीण ग्रामपंचायत यांच्या वतीने जय्यत तयारी करण्यात आली.यात्रेसाठी दरवर्षी होणारी गर्दी पाहता ट्रस्टच्यावतीने दर्शनासाठी येणाऱ्या भाविकांचे उन्हापासून संरक्षण व्हावे म्हणून मंदिराच्या बाहेर तसेच मंदिर आवारात मंडपाची व्यवस्था करण्यात आली.मंदिर आवारात ट्रस्टच्यावतीने देणगी कक्ष उभारण्यात आला.यावेळी करण्यात आलेल्या आव्हानाला भाविकांनी चांगला प्रतिसाद दिला.ट्रस्टचे अध्यक्ष प्रकाश धारीवाल,सहचिटणीस तुळशीराम परदेशी,खजिनदार पोपटराव दसगुडे,विश्वस्त गोधाजी घावटे,रावसाहेब पाटील,बलदेवसिंग परदेशी,वाल्मिकराव कुरंदळे,नामदेवराव घावटे,जगन्नाथ पाचर्णे,बबनराव कर्डिले,कारभारी झंजाड यांच्यासह शिरूर ग्रामीणचे सरपंच नामदेवराव जाधव,माजी आदर्श सरपंच अरुण घावटे,विठ्ठल घावटे,माजी उपसरपंच संजय शिंदे,भरत बोऱ्हाडे,बाबाजी वर्पे,ग्राहक पंचायतीचे शहराध्यक्ष दिनकर साबळे आदी यावेळी उपस्थित होते.
            .यात्रेचा दिवस हा छोट्या-मोठ्या व्यवसायांसाठी एक मोठी संधी असते.कोरोना मुळे दोन वर्ष या व्यावसायिकांना अडचणीला सामोरे जावे लागले.यामुळे आज या व्यावसायिकांमध्ये मोठा उत्साह जाणवला. मंदिराकडे जाणाऱ्या रस्त्याच्या दुतर्फा यांनी आपले स्टॉल थाटले.यामध्ये खाद्यपदार्थ शीतपेये यापासून लहान मुलांची खेळणी तसेच विविध प्रकारच्या वस्तूंचे स्टॉल्स होते.दोन वर्षांच्या खंडानंतर यात्रा भरल्याने भाविकांनीही मोठी गर्दी करत रामलिंगाच्या दर्शनानंतर या स्टॉल्सवर खरेदीसाठी हजेरी लावली.शिरूर शहरापासून रामलिंग मंदिराचे अंतर तीन किलोमीटर असून मंदिराकडे जाण्यासाठी दरवर्षी एसटी महामंडळाच्या वतीने भाविकांसाठी विशेष व्यवस्था करण्यात येते.एसटीचा संप असतानाही या वर्षी शिरूर एस टी आगराने भाविकांसाठी बसेसची व्यवस्था केली.दुसरीकडे स्वतःच्या दुचाकी-चारचाकी वाहनातून,ज्यांच्याकडे वाहने नाहीत अशांनी खाजगी वाहनांच्या माध्यमातून मंदिराकडे प्रस्थान केले.मोठ्या प्रमाणावर भाविकांनी आनंदाने पायी चालत मंदिर गाठले.श्री हाइट्स या सोसायटी पासून ते बालाजी शाळेपर्यंत विविध ठिकाणी रस्त्याच्या दुतर्फा विविध संस्था संघटनांच्या वतीने भाविकांसाठी मिनरल वॉटर,शीतपेये व उपवासाचे खाद्यपदार्थ याची मोफत व्यवस्था करण्यात आली.याचा भाविकांनी मनमुराद आस्वाद घेतला.संध्याकाळी शोभेचे दारूकाम पाहण्यासाठी नागरिकांनी गर्दी केली.प्रकाश धारीवाल यांच्या हस्ते याचे उद्घाटन करण्यात आले.
या वर्षी मंदिरावर फारच आकर्षक रोषणाई करण्यात आली.रात्रीच्या वेळी मंदिराचे रुप अतिशय मनमोहक असे दिसून येत होते.भाविकही मंदिराचे असे रुप पाहून भारावून गेले.

Leave A Reply

Your email address will not be published.