शिरूरनामा न्यूज नेटवर्क
शिरूर:अशाप्रकारे सण साजरा करूया,उपेक्षित,वंचितांच्या मनांत दीप प्रज्वलित करूया…गेली पन्नास हून अधिक वर्ष याच भावनेतून धारीवाल कुटुंबीय शहरातील झोपडपट्टी वासियांना मिठाई वाटप करून त्यांच्या मनात दीप प्रज्वलित करण्याचा प्रयत्न करीत आहेत.
शहरात सर्वत्र दीपावलीचा सण मोठ्या उत्साहात साजरा होत असताना शहरातील झोपडपट्टीय बांधव या उत्सवापासून वंचित राहू नये म्हणून माणिकचंद धारीवाल यांनी या घटकांना मिठाई वाटपाची परंपरा सुरू केली.ही परंपरा रसिकलाल धारीवाल व त्यांच्या नंतर प्रकाश धारीवाल यांनी जोपासली.तारुण्यात पदार्पण केलेले माणिकचंद धारीवाल यांचे पणतू आदित्य धारीवाल हे ही उज्वल परंपरा पुढे नेत आहेत.आज आदित्य धारीवाल यांनी झोपडपट्टी परिसरात दारोदारी जाऊन मिठाईचे वाटप केले.मिठाई मिळाल्यानंतर या वंचित घटकांच्या चेहऱ्यावर उमटलेले आनंदाचे भाव पाहण्यासारखे होते.अनेकांनी आदित्य यांना भरभरून आशीर्वादही दिले.धारीवाल कुटुंब दरवर्षी देशभरात कोट्यवधीचे दान देत असतात.दातृत्वाबद्दल त्यांची ख्याती आहे.तरीही आपल्या गावातील गरीब बांधवांच्या चेहऱ्यावर आनंदाचे प्रकट झालेले भाव आदित्य यांना जास्तच भावल्याचे आज प्रकर्षाने जाणवले.आपला मुलगा आपल्या कुटुंबाची परंपरा पुढे नेत असताना पाहून प्रकाश धारीवाल यांच्या चेहऱ्यावर देखील एक वेगळेच समाधान दिसून आले.आजी माजी नगरसेवक,विविध संस्था संघटनांचे पदाधिकारी यावेळी उपस्थित होते.