धारिवाल कुटुंबाकडून अयोध्येतील श्रीराम मंदिरासाठी दीड कोटींची देणगी

धारिवाल कुटुंबाची दातृत्वाची परंपरा

0

शिरूरनामा न्यूज नेटवर्क

शिरूर: अयोध्या येथील श्रीराम मंदिराच्या उभारणीसाठी देशातील दातृत्व संपन्न थोर उद्योगपती प्रकाश रसिकलाल धारीवाल यांच्या वतीने दीड कोटी रुपयांची देणगी देण्यात आली. श्रीराम जन्मभूमी तीर्थक्षेत्र ट्रस्टचे प्रमुख विश्वस्त व खजिनदार आचार्य स्वामी श्री. गोविंद देवगिरीजी महाराज यांनी ही देणगी स्वीकारली.

शिरूर (जिल्हा पुणे) येथील मूळ रहिवासी असलेले धारिवाल कुटुंब हे आपल्या दातृत्वा बाबत संपूर्ण देशात परिचित आहे. देशात श्रीमंतांची संख्या कमी नाही.मात्र सामाजिक,शैक्षणिक,अध्यात्मिक,आरोग्य अशा विविध क्षेत्रात या कुटुंबाने कोट्यवधी रुपयांचे दान करून आपल्या दातृत्वाचा एक आदर्श देशात निर्माण केला आहे. माणिकचंद धारीवाल यांनी सुरू केली दातृत्वाची ही परंपरा त्यांचे पुत्र रसिकलाल धारीवाल व त्यांच्यानंतर यांचे नातू प्रकाश धारिवाल यांनी अव्याहतपणे सुरू ठेवली आहे. श्रीराम मंदिराच्या उभारणीसाठी निधीचे संकलन केले जात आहे. मंदिराच्या उभारणीत आपलाही खारीचा वाटा असावा या भावनेतून प्रकाश धारिवाल यांनी १ कोटी ५१ लाख रुपये देणगी देण्याचा निर्णय घेतला.आचार्य स्वामी श्री गोविंददेव गिरीजी महाराज यांनी धारीवाल यांच्या पुणे येथील निवासस्थानी या निधीचा धनादेश स्वीकारला. धारीवाल कुटुंबाची विनम्रता पाहून गोविंददेव गिरीजी महाराज आश्चर्यचकित झाले. दिनाभाभी धारीवाल,आदित्य धारीवाल, धारिवाल यांच्या भगिनी उज्वला लुंकड, सुरेखा चोपडा, उद्योगपती हिरालाल मालू, एडवोकेट एस के जैन, सतीश चोपडा आदी या वेळी उपस्थित होते.

Leave A Reply

Your email address will not be published.