सेलिब्रिटीच बनले ज्ञानगंगा महोत्सवाचे चाहते

विद्यार्थ्यांचे विविध थीमवर उत्कृष्ट सादरीकरण

0
शिरूरनामा न्यूज नेटवर्क
शिरूर:भव्य व्यासपीठ,लखलखणारी लाईट व्यवस्था, उत्कृष्ट साऊंड सिस्टिम,एलईडी स्क्रीन,त्यावरचे लाईव्ह प्रक्षेपण आणि विविध थीम्स वर विद्यार्थ्यांनी केलेले बहारदार सादरीकरण पाहून कार्यक्रमास निमंत्रित सेलेब्रिटीच ज्ञानगंगा महोत्सवाचे चाहते बनल्याचे दिसून आले.ग्रामीण भागात ज्ञानगंगा एज्युकेशन सोसायटीने विद्यार्थ्यांसाठी केलेल्या भव्य नियोजनाचे सेलेब्रिटीनी कौतुक केले.
         ज्ञानगंगा एज्युकेशन सोसायटी संचालित ज्ञानगंगा विश्वविद्यालय न्यू कॉलेज अँड सायन्स,कॉमर्स अँड सायन्स यांच्या वतीने ‘ज्ञानगंगा महोत्सव २०२२-२०२३’ चे आयोजन करण्यात आले होते. प्रसिद्ध निर्माता,दिग्दर्शक भाऊसाहेब कऱ्हाडे, चला हवा येऊ द्या फेम अभिनेते भारत गणेशपुरे श्रेया बुगडे यांच्या उपस्थितीने महोत्सवात एकच रंगत आली. कऱ्हाडे यांनी आपला चित्रपट प्रवास उलघडून सांगताना विद्यार्थी व पालकांना मोलाचे मार्गदर्शन केले.गणेशपुरे यांनी विद्यार्थी व पालकांचे मनोरंजन करतानाच जीवनात यशस्वी व्हायचे असेल तर जिद्द चिकाटी व कष्ट महत्त्वाचे असल्याचे अधोरेखित केले.श्रेया बुगडे यांनी वयाच्या आठव्या वर्षी अभिनयाचा प्रवास सुरू केल्याचे सांगताना चला हवा येऊ द्या या कार्यक्रमातील प्रवासाबद्दल माहिती दिली.ग्लॅमर,प्रसिद्धी,पैसा मिळाला तरी डोक्यात थोडीही हवा आम्ही येऊ दिली नसल्याचे सांगितले.यावेळी विद्यार्थी,पालक व शिक्षकांनी विचारलेल्या विविध प्रश्नांना त्यांनी दिलखुलासपणे उत्तरे दिली.विविध कलाकारांची मिमिक्रीही यावेळी त्यांनी करून दाखवली.त्याला प्रेक्षकांची उत्स्फूर्त दाद मिळाली.
                दरम्यान महोत्सवात पहिल्या दिवशी प्राथमिक व पूर्व प्राथमिक शाळेच्या ७०० हून अधिक विद्यार्थ्यांनी’बाल विश्व मौज मस्ती धमाल’ या थीम अंतर्गत विविध कला प्रकारांचे सादरीकरण केले. महोत्सवाच्या दुसऱ्या दिवशी महाराष्ट्र संस्कृती थीम अंतर्गत विद्यार्थ्यांनी शिवकाल,झाशीची राणी, विनोदी कार्यक्रम,कीर्तन,लावणी इत्यादी कला सादर केल्या. महोत्सवाच्या शेवटच्या दिवशी बॉलीवूड मधील जुन्या तसेच नव्या अभिनेत्यांचा गाण्यावर विद्यार्थ्यांनी उत्कृष्ट नृत्य सादर केले.या महोत्सवासाठी उभारण्यात आलेले भव्य व्यासपीठ, लखलखणारी लाईट व्यवस्था,उत्कृष्ट साऊंड सिस्टिम, एलईडी स्क्रीन, त्यावरचे लाईव्ह प्रक्षेपण आणि विविध थीम्स वर विद्यार्थ्यांनी केलेले बहारदार सादरीकरण पाहून सर्वच सेलिब्रिटीज भारावून गेले.ग्रामीण भागात ज्ञानगंगा एज्युकेशन सोसायटीने विद्यार्थ्यांनी केलेल्या भव्य नियोजनाचे सेलेब्रिटीनी कौतुक केले.
           पुणे महानगरपालिकेचे उपायुक्त मिनिनाथ दंडवते,पारनेरचे आमदार निलेश लंके,दौंडचे आमदार राहुल कुल,जिल्हा परिषदेचे माजी सभापती प्रदीप कंद, माजी सदस्य राहुल पाचर्णे, संपदा पतसंस्थेचे चेअरमन प्रभाकर डेरे,मालतीताई पाचर्णे, पोलीस निरीक्षक सुरेशकुमार राऊत,माजी नगराध्यक्ष उज्वला बरमेचा,शिरूर ग्रामीणच्या सरपंच स्वाती घावटे,माजी सरपंच अरुण घावटे,विठ्ठल घावटे,वात्सल्य सिंधूच्या सचिव उषा वाखारे,जनता दलाचे प्रदेशाध्यक्ष नाथा शेवाळे,गंगा एज्युकेशन सोसायटीचे चेअरमन डॉ. राजाराम घावटे, उपाध्यक्ष दीपक घावटे, संचालक सुधीर शिंदे, प्रसाद घावटे,अमृता घावटे, मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ.नितीन घावटे, मुख्याध्यापक संतोष येवले,रूपाली जाधव आदी उपस्थित होते.या महोत्सवात पत्रकार,निवेदक,विविध शाळांचे मुख्याध्यापक,केंद्रप्रमुख,विस्तार अधिकारी, संगणक संस्थांचे संचालक आदींना उपस्थित मान्यवरांच्या हस्ते गौरविण्यात आले.शोभा अनाप,कविता वाडेकर व प्रसिद्ध निवेदक रावसाहेब चक्रे यांनी सूत्रसंचालन केले,डॉ. नितीन घावटे यांनी आभार मानले.

Leave A Reply

Your email address will not be published.