भाजपा शहराध्यक्षपदाचा नितीन पाचर्णे यांचा राजीनामा

0

शिरूरनामा न्यूज नेटवर्क

शिरूर:भाजपा शहराध्यक्ष नितीन पाचर्णे यांनी आपल्या पदाचा राजीनामा दिला असून अद्याप राजीनामा स्वीकारण्यात आला नसल्याचे तालुकाध्यक्ष आबासाहेब सोनवणे यांनी सांगितले.पाच वर्ष अध्यक्षपद भूषवल्याने राजीनामा दिल्याचे पाचर्णे यांनी सांगितले असलेतरी कारण वेगळे असल्याचे खात्रीलायक वृत्त आहे.

पाचर्णे यांची भाजपा शहराध्यक्षपदी फेरनियुक्ती करण्यात आली होती. नवा कार्यकाळ सुरू होऊन काही दोन महिनेच उलटले असताना पाचर्णे यांनी राजीनामा दिल्याने पक्षात सर्व काही आलबेल आहे.असे म्हणता येणार नाही.पाचर्णे यांचेशी संपर्क साधला असता, तालुकाध्यक्ष आबासाहेब सोनवणे यांच्याकडे राजीनामा सोपविला असल्याचे त्यांनी सांगितले.नुकतीच आपली फेरनिवड झाली असताना आपण राजीनामा का दिलात असे विचारले असता,गेली पाच वर्ष मला शहराध्यक्ष पदाची संधी मिळाली.त्यामुळे आता राजीनामा देत आहे.असे मोघम उत्तर त्यांनी दिले.खरे कारण काय आहे.याबाबत त्यांनी मौन बाळगणे पसंद केले.राजीनामा दिला असला तरी पक्षासोबत असल्याचे पाचर्णे यांनी स्पष्ट केले.राजीनाम्याबाबत तालुकाध्यक्ष सोनवणे म्हणाले,पाचर्णे यांनी राजीनामा दिला आहे.मात्र राजीनामा मंजूर करण्यात आला नाही.आज पक्षाची खेड येथे बैठक झाली.यावेळी जिल्हाध्यक्ष शरद बुट्टे पाटील यांना पाचर्णे यांच्या राजीनाम्याची माहिती देण्यात आली असून पाचर्णे यांचे मन वळविण्यासाठी बुट्टे पाटील पाचर्णे यांच्याशी संपर्क साधणार आहे.शिरूर हवेली भाजपचे प्रभारी प्रदीप कंद यांनीही पाचर्णे यांच्याशी संपर्क साधून राजीनामा मागे घेण्यास सांगितल्याचे सोनवणे यांनी सांगितले.

विधानसभेच्या तोंडावर पाचर्णे यांचा राजीनामा पक्षाला परवडणारा नसून वरिष्ठ,पाचर्णे यांच्याशी बोलून त्यांची समजूत घालणार असल्याचे सोनवणे यांनी सांगितले.जिल्हा नियोजन समितीचे सदस्य राहुल पाचर्णे यांना पक्षात डावलले जात असल्याची चर्चा खोटी असून त्यांना डावलण्याचा प्रश्नच नाही.पक्षात त्यांना यथोचित सन्मान दिला जात असल्याचे सांगून सोनवणे म्हणाले. लोकसभा निवडणुकीवेळी उपमुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस फडणवीस,केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्यासह ज्या प्रमुख नेत्यांच्या शिरूर हवेली मतदारसंघात सभा झाल्या व प्रत्येक सभेत राहुल पाचर्णे यांना बोलण्याची संधी देण्यात आली.उपमुख्यमंत्री फडणवीस हे पाचर्णे यांच्या घरी गेले.माजी आमदार बाबुराव पाचर्णे यांच्या समाधीस्थळावर देखील गेले.

Leave A Reply

Your email address will not be published.