शिरूर:अजित पवारांच्या बंडामुळे शिरूर हवेली मतदार संघातील लढतीचे चित्र नेमके कसे असेल हे सांगणे सध्यातरी कठीण दिसत आहे.जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष प्रदीप कंद यांनीही विधानसभेचे नंतर पाहू.आता लक्ष फक्त लोकसभा निवडणुकीचे आहे.अशी प्रतिक्रिया शिरूरनामाशी बोलताना दिली.मुख्यमंत्री एकनाथ शिंदे व उपमुख्यंत्री देवेंद्र फडणवीस हे अतिशय प्रभावीपणे काम करीत आहेत.अजितदादा भाजपमध्ये आल्याने पक्षाची ताकद वाढली असून आता जास्त वेगाने कामे होतील.असा विश्वासही त्यांनी व्यक्त केला.
शिरूरनामा न्यूज नेटवर्क
प्रवीण गायकवाड
अजित पवारांचे अत्यंत विश्वासू सहकारी आमदार अशोक पवार हे जर दादांसमवेत भाजपमध्ये आल्यास आपली भूमिका काय असेल?या प्रश्नावर उत्तर देताना कंद यांनी विधानसभेचा निर्णय आता महत्त्वाचा नाही.लोकसभा महत्त्वाची आहे.मुख्यमंत्री शिंदे व उपुख्यमंत्री हे चांगले सरकार चालवत आहेत.जनतेच्या हिताची कामे करीत आहेत.आता अजित दादा पक्षात आल्याने आणखी वेगाने जनतेची कामे होतील अशी प्रतिक्रिया दिली.शिरूर हवेली मतदारसंघात अशोक पवार हे आमदार आहेत.आगामी विधानसभा निवडणुकीत पवार हे पुन्हा राष्ट्रवादीकडून लढतील व भाजपतर्फे कंद हे उमेदवार असतील.कंद हे भाजपमध्ये गेल्यापासून ही चर्चा आहे.कंद यांना भाजपने शिरूर हवेली मतदारसंघाचे निरीक्षक म्हणूनही नियुक्त केले आहे.गेली वर्षभरापासून कंद हे मतदार संघात वारंवार संपर्कात असल्याचे दिसून येत आहेत.एकंदरीत कंद यांची जोरदार तयारी सुरू असल्याचे चित्र आहे.काल राष्ट्रवादीमध्ये भूकंप झाला अजित पवार यांनी भाजपशी हातमिळवणी करत उपमुख्यमंत्री पदाची शपथ घेतली.त्यांच्या बरोबरच ८ जणांनी मंत्रिपदाची शपथ घेतली.या घडामोडी पाहता अजित दादांचे अत्यंत विश्वासू सहकारी आमदार अशोक पवार हे देखील अजित दादांसमवेत जातील अशा अटकली बांधल्या जात आहेत.याबाबत आमदार पवार यांची प्रतिक्रिया मिळाली नसली तरी याच शक्यतेला बळ मिळताना दिसत आहे.असे झाले तर आमदार पवार हे देखील भाजपवासी होतील.मग भाजपाची उमेदवारी नेमकी कोणाला मिळणार हा प्रश्न निर्माण होणार आहे.(पवार की कंद?)भाजप,शिवसेना व राष्ट्रवादीच्या या अनोख्या युतीमध्ये विधानसभा निवडणुक जागा वाटपाच्या वेळी शिरूर हवेलीची जागा कोणत्या पक्षाच्या वाट्याला येणार हा देखील मोठा प्रश्न आहे.शिरूर हवेलीत भाजपाच्या तुलनेत तशी राष्ट्रवादीची ताकद जास्त आहे. स्थानिक स्वराज्य संस्थेवर राष्ट्रवादीचे वर्चस्व आहे.विद्यमान आमदार पक्षाचा आहे.यामुळे अजितदादा ही जागा राष्ट्रवादीला सोडण्याची मागणी करणार हे नक्की.असे झालेच तर’ फुल्ल ‘तयारीत असलेले कंद काय भूमिका घेतील हे पाहणे औत्सुक्याचे ठरेल.
आमदार पवार हे जर शरद पवार यांच्या सोबतच राहिले तर पवार’ साहेबांच्या’ राष्ट्रवादीची उमेदवारी आमदार पवार यांना मिळू शकते.मग भाजपाचे कंद विरुद्ध आमदार पवार यांची लढत होऊ शकते.असे झाल्यास आपला लाडका सहकारी अशोक पवार यांच्या विरोधात अजित दादांची नेमकी भूमिका कशी असेल हे पाहणेही औत्सुक्याचे ठरेल.या सर्व जर तरच्या गोष्टी असल्या तरी वास्तव देखील आहे.आमदार पवार हे सध्या तरी कोणताच निर्णय घेण्याच्या भूमिकेत दिसत नाहीयेत.यामुळे जेव्हा ठाम निर्णय घेतील त्यावेळी उपरोक्त नमूद केलेल्या शक्यातांना बळ मिळू शकेल.