बनुनी विरोधकाचा काल,विजयाचा आशीर्वाद माउलींना देईल महाकाल!
दर्शनाचा लाभ मिळालेल्या जनतेच्या प्रतिक्रिया
शिरूरनामा न्यूज नेटवर्क
शिरूर:महाकाल,बाळूमामा तीर्थक्षेत्राचाची सफर करून आलेली वयोवृध्द, युवती,युवक तसेच महिला ही सर्व मंडळी म्हणतात,बनुनी भ्रष्टाचारी विरोधकाचा काल,विजयाचा आशीर्वाद माउलींना देईल महाकाल.
गेली अनेक १५ वर्ष महायुतीचे उमेदवार माऊली कटके हे नागरीकांना देशभरातील तीर्थस्थळांची मोफत सफर घडवत आहेत.हजारो नागरिकांनी याचा लाभ घेतला आहे.यातून त्यांचे या नागरिकांशी एक भावनिक नाते तयार झाले आहे.त्यांना कोणी भाऊ,कोणी मुलगा मानले आहे.कटके यांना शिरूर हवेली मतदारसंघाची उमेदवारी मिळाल्यावर या नागरिकांनी आनंद व्यक्त केला.मोफत तीर्थ क्षेत्राची सफर घडवली.आता माऊली मतांसाठी आपल्या दारात येतील अशी या नागरिकांना कल्पना नव्हती.मात्र योगायोगाने मतदार संघात जिथे जिथे माऊली जात आहेत.तिथे हे नागरिक माऊलींचे स्वागत करून विजयासाठी भरभरून आशीर्वाद देत आहेत.शहरात एका महिलेने तर माऊली यांना श्रावणबाळाची उपमा दिली.आर्थिक दुर्बल कुटुंबाला इच्छा असूनही पैशाअभावी तीर्थक्षेत्राची सफर करता येत नाही.अशात शेकडो किलोमीटर दूर असलेली तीर्थ स्थळे पाहण्याची,देवदर्शन करण्याची संधी माऊलींनी उपलब्ध करून दिल्याचे सविता काळे यांनी सांगितले.शहरातील विविध भागात ज्येष्ठ नागरिक महिला म्हणतात,नवऱ्याने इतक्या वर्षात असे दर्शन घडवले नाही केवळ माउलींमुळे आम्हाला संधी मिळाल्याच्या भावना व्यक्त करीत आहे.
काही महिन्यापूर्वी आम्ही रेल्वेने उजैनला गेलो होतो.तिथे उतरताच माऊली व त्यांच्या पत्नीने सर्वांच्या अंगावर पुष्पवृष्टी करून आमचे स्वागत केले.दर तासाला पाणी बॉटल,दोन तासाला खाण्याचे पदार्थ एकूणच कटके दांपत्याने आमची मनोभावे सेवा केल्याचे शकुंतला कळमकर,मेघा लाडेवार,शालन सोनवणे यांनी सांगितले.अशाच स्वरूपाच्या सर्व भाविकांच्या प्रतिक्रिया आहेत.मुस्लिम बांधवांसाठी देखील गुलबर्गा येथे मोफत देवदर्शनाची व्यवस्था त्यांनी केली होती.या बांधवांनीही माउलींना विजयाच्या शुभेच्छा दिल्या.मोफत तीर्थक्षेत्र सफर आणि उत्तम नियोजन व आदरातिथ्य यामुळे माऊलींनी या नागरिकांच्या मनात घर केल्याचे दिसून येत आहे.आता हे दर्शनार्थी आम्ही व आमचे कुटुंबीय कोणाच्याही प्रलोभनाला बळी न पडता माउलींनाच मतदान करणार आहोत असे सांगताना, बनुनी भ्रष्टाचारी विरोधकाचा काल,विजयाचा आशीर्वाद माउलींना देईल महाकाल.अशा प्रतिक्रिया व्यक्त करीत आहेत.