शिरूरनामा न्यूज नेटवर्क
शिरूर:तालुक्याचे आमदार म्हणून तसेच खरेदी विक्री संघासह तालुक्यात इतर संस्था स्थापन करून त्या वाढवण्यासाठी मोलाचे योगदान देणाऱ्या माजी आमदार रावसाहेबदादा पवार यांचा शिरूर कृषी उत्पन्न बाजार समितीच्या आवारात पुतळा बसवला जावा असा मानस शिरूर तालुका खरेदी-विक्री संघाचे सभापती राजेंद्र नरवडे व त्यांच्या पत्नी संघाच्या सदस्य सुजाता नरवडे यांनी व्यक्त केला.
आमदार पवार म्हणाले,रावसाहेबदादा पवार यांच्यानंतर चुकीच्या हातांमध्ये संघाची सत्ता गेली.या मंडळींनी संस्थेच्या जमिनी,गोडाऊनची विक्री केली,तरीही संघ तोट्यात होता.राष्ट्रवादीच्या ताब्यात संघ आल्यानंतर गाळात गेलेला संघ बाळासाहेब नागवडे,शरद कालेवार तसेच नरवडे व सहकाऱ्यांनी बाहेर काढला.बाजार समितीही तोट्यात होती.राष्ट्रवादीच्या ताब्यात सत्ता आल्यानंतर शशिकांत दसगुडे,शंकर जांभळकर व सहकाऱ्यांनी काही महिन्यातच समिती फायद्यात आणली.बाजार समितीची आठ कोटी रुपयांची नवीन इमारत उभारली जाणार असल्याची माहिती आमदार पवार यांनी यावेळी दिली.