शिरूर:झांज पथकाचा दणदणाट,युवकांच्या लाठीकाठीची तर युवतींच्या लेझीम पथकाची उत्कृष्ट प्रात्यक्षिके,जिजाऊंचा जयघोष व केसरी साड्या,डोक्यावर केसरी फेटा परिधान करून राष्ट्रमाता, राजमाता माँसाहेब जिजाऊंच्या जयंतीनिमित्त त्यांच्या प्रतिमेच्या काढलेल्या मिरवणुकीत सहभागी झालेल्या जिजाऊंच्या लेकी यामुळे अवघे शिरूर जिजाऊ झाल्याचे दिसून आले.
शिरूरनामा न्यूज नेटवर्क
अखिल भारतीय मराठा महासंघाच्या वतीने जिजाऊ मातेच्या जयंती उत्सव सोहळ्याचे आयोजन करण्यात आले होते. बाजार समितीतील छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्यास महासंघाच्या युवती स्नेहा लंघे, साक्षी वाखारे,श्रावणी सांबारे,श्रुती वर्पे,सानिका राक्षे या युवतीच्या हस्ते पुष्पहार अर्पण करून जिजाऊंच्या मिरवणूकीची सुरुवात करण्यात आली.मिरवणुकीत सजवण्यात आलेल्या रथावर पल्लवी सरोदे या युवतीने जिजाऊंची व्यक्तिरेखा साकारली.यावेळी पुतळा परिसरात महासंघाच्या पदाधिकारी,सदस्यांसह शहरातील विविध स्तरातील मोठ्या संख्येने उपस्थित असलेल्या केसरी साडी व केसरी फेटा परिधान केलेल्या महिलांमुळे व या महिला देत असलेल्या जिजाऊंच्या जयघोषामुळे एकच चैतन्यमय वातावरण निर्माण झाले.सोबत झांज पथकाचा दणदणाट, युवकांच्या लाठीकाठीची तर युवतींच्या लेझीम पथकाची उत्कृष्ट प्रात्यक्षिके यामुळे मिरवणुकीच्या सुरुवातीलाच एकच रंगत निर्माण झाली. शिवाजी महाराजांच्या पुतळ्यापासून सुरू झालेली
मिरवणूक जुन्या पुणे नगर रस्त्यावरून पुढे निघाली. जिजाऊंच्या लेकिंसह महासंघाचे पदाधिकारी तसेच शहरातील विविध क्षेत्रातील मान्यवर देखील हातात केसरी झेंडे फडकावत या मिरवणुकीत मोठ्या संख्येने उपस्थित असल्याचे दिसून आले. जिजाऊ व छत्रपती शिवाजी महाराजांच्या जयघोषाने आसमंत यावेळी दुमदुमून गेला.इंदिरा गांधी पुतळ्याजवळ मिरवणुकीची सांगता करण्यात आली.मिरवणुकीच्या या टप्प्यात जिजाऊंची मिरवणूक पाहण्यासाठी नागरिकांनी एकच गर्दी केली. ठिकठिकाणी मिरवणुकीचे स्वागत करण्यात आले.महासंघाच्या महाराष्ट्र सरचिटणीस शोभना पाचंगे,पुणे जिल्हा महिलाध्यक्ष शैलजा दुर्गे,पुणे जिल्हा युवक कार्याध्यक्ष अविनाश जाधव,माजी तालुकाप्रमुख सुदाम कोलते,शिरूर तालुकाध्यक्ष शामकांत वर्पे,शहराध्यक्ष साधना शितोळे,महिला तालुकाध्यक्ष
उर्मिला फलके,युवक तालुकाध्यक्ष गणेश सरोदे,
शिक्षक आघाडी तालुकाध्यक्ष ज्योती वाळके,तालुका सदस्य सुवर्णा पावले,सोनाली सरोदे,संगीता दसगुडे
शहर सदस्य जयश्री थेऊरकर,भारती बारवकर, रूपाली चौधरी,रेखा तुपे, जि. प. कृषी पशुसंवर्धन समितीच्या माजी सभापती सुजाता पवार, माजी नगराध्यक्षा उज्वला बरमेचा,उपनगराध्यक्ष जाकीरखान पठाण,
नगरसेविका सुरेखा शितोळे,रोहिणी बनकर,मराठा सेवासंघाचे अध्यक्ष नामदेवराव घावटे, माजी जि.प.सदस्य शेखर पाचुंदकर,,बाजार समितीचे माजी संचालक राजेंद्र थिटे,माजी नगरसेवक निलेश लटांबळे,शिक्षण मंडळाचे माजी सभापती संतोष शितोळे,तुकाराम खोले,माजी सदस्य प्रशांत शिंदे,जनतादलाचे जिल्हाध्यक्ष संजय बारवकर,निवृत्त अधिकारी रावसाहेब शेटे, थिटे महाविद्यालयाचे प्राचार्य द्वारकादास बाहेती, डॉ. अमोल शहा,सामाजिक कार्यकर्ते सागर नरवडे,बजरंग दलाचे उमेश शेळके,शहर पंचक्रोशी शिवजयंती उत्सव समितीचे अध्यक्ष कृणाल काळे,निलेश नवले,सागर पांढरकमे, वैभवीच्या महासंघाच्या अध्यक्षा आशा पांचगे,आदिशक्तीच्या अध्यक्षा सुनंदा लंघे, सचिव लता नाझिरकर, वात्सल्यसिंधूच्या सचिव उषा वाखारे,जया थेऊरकर, स्वाती थोरात,यशस्विनीच्या शहराध्यक्ष नम्रता गवारी,मनीषा तरटे,राजश्री ढमढेरे, शिला पांचगे आदींसह मोठ्या संख्येने महिला उपस्थित होत्या.तर्डोबाची वाडीचे भैरवनाथ झांज पथक,शितोळे करिअर अँकेडमीचे पथक खंडाळे जि प प्राथमिक शाळाचे लेझीम पथक मिरवणुकीत सहभागी झाले न्यू इंग्लिश स्कूल,अण्णापुरच्या विद्यार्थ्यांनी लाठी काठीची प्रात्यक्षिके सादर केली.