आनंद पतसंस्था अपहारप्रकरणी ठेवीदारांचे आंदोलन

0

शिरूरनामा न्यूज नेटवर्क 

शिरूर:आनंद नागरी सहकारी पतसंस्थेतील अपहार प्रकरणी एम पी आय डी (महाराष्ट्र ठेवीदारांचे हितसंबंध संरक्षण कायदा)कायद्यानुसार गुन्हा दाखल करून आर्थिक गुन्हे शाखेकडे हे प्रकरण वर्ग करावे तसेच संचालंकांवरही गुन्हा दाखल करावा.या मागणीसाठी ठेवीदारांनी आंदोलन केले.पोलीस उपविभागीय अधिकारी तसेच शिरूर पोलिसांकडे ठेवीदारांच्या वतीने निवेदन देण्यात आले.

             आनंद नागरी सहकारी पत संस्थेमध्ये १६ कोटी १५ लाख २६ हजार ५५५ रुपयांचा अपहार केल्याप्रकरणी पतसंस्थेचे अध्यक्ष अभयकुमार चोरडिया यांच्यासह त्यांच्या विविध फर्मचे भागीदार तसेच तत्कालीन लेखापरीक्षक व व्यवस्थापक यांच्या विरोधात ४२०,४०९ तसेच ३४ कलमानुसार पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.ठेवीदारांच्या म्हणण्यानुसार चोरडिया व त्यांच्या भगिदारांनी विविध फर्मसाठी घेतलेले एकूण कर्ज रक्कम १६ कोटी १५ लाख २६ हजार ५५५ अधिक व्याज ८ कोटी ९२ लाख ६९ हजार ३५० रुपये व बेकायदा वसूलपात्र सूट रक्कम ५५ लाख २७ हजार ७०६ असे मिळून २५ कोटी ६३  लाख २३ हजार २११ रुपये एवढ्या रकमेचा अपहार असताना केवळ मुद्दल रकमेचा अपहार झाल्याची तक्रार देण्यात आली.संपूर्ण रकमेचा एफ आय आर दाखल करून  एम पी आय डी (महाराष्ट्र ठेवीदारांचे हितसंबंध संरक्षण कायदा) कायद्यानुसार गुन्हा दाखल करावा तसेच आर्थिक गुन्हे शाखेकडे हे प्रकरण वर्ग करावे.अशा मागणीचे निवेदन पोलिसांना देण्यात आले.
             गुन्हा दाखल झालेली मंडळी अटक पूर्व जमिनीच्या  तयारीत असून त्यांना जामीन मिळाल्यास ठेवीदारांना पैसे मिळण्यास अडचणी निर्माण होतील.अशी भीती व्यक्त करून संबंधितांना तात्काळ अटक करावी.अशी मागणी करण्यात आली आहे. ॲड.सुभाष जैन,रामदास सरड,योगेश चंडालीया यांच्यासह मोठ्या प्रमाणावर ठेवीदार उपस्थित होते.

Leave A Reply

Your email address will not be published.