आमदार पवार दाम्पत्यामुळे कोविड केअर सेंटर्समधील रुग्णांचा सण गोड
रुग्णांना पुरणपोळी व शीरखुर्माची मेजवानी
शिरूर:अक्षय तृतीया,रमजान ईद व छत्रपती संभाजी महाराज जयंतीचे औचित्य साधून आमदार अशोक पवार,जिल्हा परिषद कृषी व पशुसंवर्धन खात्याच्या माजी सभापती सुजाता पवार या दाम्पत्याच्या व रावलक्ष्मी फाउंडेशनच्या वतीने शिरूर-हवेलीतील सर्व प्रतिभा आरोग्य केंद्रातील (कोविड केअर सेंटर) रुग्णांचा सण गोड करण्यासाठी पुरणपोळीची मेजवानी देण्यात आली.आज संध्याकाळी या रुग्णांना शीरखुर्माचीही मेजवानी देण्यात येणार आहे.