शिरूर:लॉकडाऊनमुळे अडचणीत सापडलेल्या रिक्षाचालक बांधवांना आमदार अशोक पवार यांनी मदतीचा हात दिला.आज या बांधवांना जीवनावश्यक वस्तूंचे वाटप करण्यात आले. . लॉकडाऊनमुळे गेली दोन महिन्यापासून रिक्षाचालकांचे व्यवसाय बंद आहेत.आता व्यवसायास परवानगी मिळाली.मात्र प्रवाशांअभावी व्यवसाय होत नसल्याचे चित्र आहे.यामुळे त्यांच्या अडचणीत भर पडली होती. ‘शिरुरनामाने’ रिक्षाचालक बांधवांची ही व्यथा मांडली होती.शहर राष्ट्रवादीचे अध्यक्ष मुजफ्फर कुरेशी, वकिल संघटनेचे माजी अध्यक्ष अॅड. रविंद्र खांडरे यांनी त्वरीत शिरूरनामाने मांडलेली व्यथा आमदार पवार यांच्यापुढे मांडली.आमदार पवार यांनी यास प्रतिसाद देत रिक्षाचालक बांधवांना जीवनावश्यक वस्तूंचे वाटप करण्याच्या सुचना कुरेशी व खांडरे यांना दिल्या.यानुसार आज शिरूर बसस्थानकाच्या आवारात रिक्षाचालक बांधवाना जीवनावश्यक वस्तूंचे वाटप करण्यात आले.कुरेशी, खांडरे यांच्यासह माजी नगराध्यक्ष रविंद्र ढोबळे, राष्ट्रवादीचे माजी शहराध्यक्ष संतोष भडारी, राष्ट्रवादी वकील संघटनेचे अध्यक्ष अॅड शिरीष लोळगे, राष्ट्रवादी महिला तालुकाध्यक्षा संगिता शेवाळे, शहर कार्याध्यक्ष रंजन झांबरे, तरडोबावाडीच्या उपसरपंच तज्ञीका कर्डिले,बिजवंत शिंदे,वैभव वारे राहिल शेख,कलिम सय्यद आदि यावेळी उपस्थित होते.
लॉकडाऊनमुळे अडचणीत सापडलेल्या कष्टकरी,शेतकरीवर्गाला दिलासा देण्यासाठी आमदार पवार यांच्या वतीने शहर व तालुक्यात अशा हजारो घटकांना जीवनावश्यक वस्तूंचे वाटप केले जात आहे. रिक्षाचालक बांधवांची व्यथा समजताच आमदार पवार यांनी या बांधवांना जीवनावश्यक वस्तूंचे वाटप करण्याचा सुचना दिल्या.यानुसार वस्तूंचे वाटप करण्यात आल्याचे अॅड. लोळगे यांनी सांगितले. लॉकडाऊन कालावधीत ज्यांची परवड झाली.अशा घटकांची आमदार पवार यांनी जातीने लक्ष देऊन माहिती घेतली.यामुळे त्यांना आधार मिळाल्याची भावना कुरेशी व खांडरे यांनी व्यक्त केली.माजी नगराध्यक्ष ढोबळे यांनी होलार बांधवांची व्यथा आमदार पवार यांच्यासमोर मांडली होती.आमदार पवार यांनी या बांधवांनाही मदतीचा हात दिला.ढोबळे यांच्या हस्ते या बांधवांनाही आज जीवनावश्यक वस्तूंचे वाटप करण्यात आले.