अजित पवार यांच्याबद्द्ल आक्षेपाई वक्तव्य करणाऱ्या महिलेस अटक
शिक्रापूर पोलिसांनी बुलढाणा येथून घेतले ताब्यात
शिक्रापूर : राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्याबद्दल सोशल मिडीयावर आक्षेपार्ह वक्तव्य केल्या प्रकरणी शिक्रापूर पोलिसांनी बुलढाणा जिल्ह्यातून एका महिलेला ताब्यात घेतले.या महिलेस अटक करण्यात आली आहे..
संगीता वानखेडे (रा. चाकण ता. खेड जि. पुणे ) असे अटक केलेल्या महिलेचे नांव आहेे.कोंढापूरीचे माजी सरपंच स्वप्नील अरुण गायकवाड यांनी शिक्रापूर पोलीस ठाण्यात दिलेल्या फिर्यादीनुसार या महिलेविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला होता. या प्रकरणाचा तपास करीत असताना वानखेडे यांना बुलढाणा पोलिसांनी अटक केल्याचे समोर आले होतेे. याबाबत माहिती मिळताच शिक्रापूर पोलिसांनी वानखेडे यांना अटक करण्यासंदर्भात न्यायालयीन प्रक्रिया पूर्ण करून त्यांना बुुलढाणा येथून ताब्यात घेतले.पोलीस स्टेशनचे पोलीस उपनिरीक्षक राजेश माळी, पोलीस शिपाई किशोर शिवणकर, महिला पोलीस स्नेहल गायकवाड, सिमा बोचरे यांच्या पथकाने ही कारवाई केली.शिक्रापूर पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक सदाशिव शेलार यांच्या मार्गदर्शना खाली शिक्रापूर पोलिस करत आहे.(धनंजय गावडे)