आदित्य धारिवाल यांची रक्तदान करून आजोबांना आदरांजली
रसिकभाऊ धारिवाल यांच्या जयंती निमित्त ३३३ रक्तदात्यांनी केले रक्तदान
शिरूरनामा न्यूज नेटवर्क
शिरूर:स्व,रसिकभाऊ माणिकचंद धारीवाल यांच्या जयंती निमित्त प्रकाशभाऊ धारिवाल मित्र मंडळ व मोरया जिम हेल्थ क्लब यांच्या वतीने आयोजित रक्तदान शिबिरात ३३३ रक्तदात्यांनी रक्तदान केले.रसिकभाऊ यांचे नातू आदित्य प्रकाश धारिवाल यांनीही या शिबिरात प्रथमच रक्तदान करून आपल्या आजोबांना आदरांजली वाहिली.
एक मार्च रसिकभाऊ यांची जयंती असून यानिमित्त येथील नगरपरिषद मंगल कार्यालयात रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. आपल्या दातृत्वमुळे देशभरात प्रसिद्ध असलेल्या रसिकभाऊंवर शिरूरकरांचे मनस्वी प्रेम असल्याने सकाळपासूनच या रक्तदान शिबिरास उस्फुर्त प्रतिसाद मिळाल्याचे दिसून आले.युवक व तरुणांचा या शिबिरात मोठा सहभाग होता. नगराध्यक्ष वैशाली वाखारे, शिरूर शहर विकास आघाडीचे अध्यक्ष सुभाष पवार, रक्ताचे नाते ट्रस्ट चे अध्यक्ष राम बांगड व आदित्य धारिवाल यांच्या हस्ते रसिकभाऊंच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून रक्तदान शिबिराचे उद्घाटन करण्यात आले. माजी उपनगराध्यक्ष जाकीरखान पठाण,माजी नगराध्यक्ष रवींद्र ढोबळे, राजेंद्र क्षीरसागर,स्वच्छता व आरोग्य समितीचे सभापती विठ्ठल पवार, पाणीपुरवठा समितीचे सभापती मुजफ्फर कुरेशी,बांधकाम समितीचे सभापती अभिजीत पाचर्णे, नगरसेवक संदीप गायकवाड,निलेश गाडेकर,नगरसेविका सुरेखा शितोळे, मनीषा कालेवार, संगीता मल्लाव, रोहिणी बनकर, रेश्मा लोखंडे, व्यापारी असोसिएशनचे उपाध्यक्ष संतोष भंडारी, माजी नगरसेवक निलेश लटांबळे, सरपंच विलास कर्डिले, निलेश पवार,मनसेचे सुशांत कुटे,अविनाश घोगरे मयूर नहार आदी यावेळी उपस्थित होते.
प्रत्येक रक्तदात्यास प्रमाणपत्र, स्मृतिचिन्ह व एक भेटवस्तू देऊन सन्मानित करण्यात आले.अभिजीत पाचर्णे, विठ्ठल पवार,शिक्षण मंडळाचे माजी सभापती तुकाराम खोले,संतोष शितोळे,मयुर जिम हेल्थ क्लबचे संचालक योगेश जामदार, समता परिषदेचे किरण बनकर, सागर पांढरकामे,मितेश गादिया, सागर नरवडे,दादा लोखंडे, बंटी जोगदंड यांनी रक्तदान शिबिर आयोजनात विशेष सहभाग घेतला.
रक्तदानाचा विक्रम केलेल्या व सातत्याने गरजूंना रक्त मिळवून देण्यासाठी झटणाऱ्या राम बांगड तसेच ५७ व्या वेळी रक्तदान करणाऱ्या रिक्षा पंचायतीचे अध्यक्ष अनिल बांडे, शिक्षण मंडळाचे माजी सभापती निलेश खाबिया व बापू गांधी यांचा यावेळी आदित्य धारिवाल यांच्या हस्ते विशेष सत्कार करण्यात आला. अभिषेक संतोष शितोळे या युवकाने समारोपावेळी रक्तदान केले.