शिरूरनामा न्यूज नेटवर्क
शिरूर:खुद्द उपमुख्यमंत्री तथा अर्थमंत्री अजित पवार यांनीच येथील शासकीय विशेष मुलींच्या बालगृहास अनुदान देण्याचा केलेला वादा समाजकल्याण विभागाच्या अधिकाऱ्यांच्या हलगर्जीपणामुळे फोल ठरला.
लाडकी बहीण योजनेअंतर्गत १८ ऑगस्ट रोजी सणसवाडी येथे आयोजित कार्यक्रमात शासकीय विशेष मुलींच्या बालगृहातील मुली तसेच कर्मचाऱ्यांनी व्यासपीठावर जाऊन उपमुख्यमंत्री पवार यांना राखी बांधली व गेली अडीच वर्षांपासून संस्थेला अनुदान मिळाले नसल्याची तक्रार त्यांच्याकडे केली.यावर उद्याच तुम्हाला अनुदान मिळेल असे सांगत त्यांनी आपल्या स्वीय सहाय्यकला संबंधित विभागाच्या अधिकाऱ्यास फोन लावण्यास सांगितले. स्वतः पवार संबंधित अधिकाऱ्याशी बोलले.दुसऱ्या दिवशी तर नाहीच मात्र २० दिवस उलटूनही बालगृहास अनुदान मिळाले नाही.अधिकारी म्हणतात निधीच नाही.यामुळे अनुदान कधी मिळेल याबाबत स्पष्टता दिसत नाही.बालगृहातील विशेष मुलींचे खऱ्या अर्थाने’ विशेष ‘संगोपन करणाऱ्या कर्मोलोदया या संस्थेला गेली अडीच वर्षांपासून शासनाने अनुदान दिले नाही.संस्थेतील २० कर्मचाऱ्यांना अडीच वर्ष पगार नाही.जिल्हा परिषद समाजकल्याण विभागाकडे त्यांनी अनुदानासाठी फाईल दिली.सातत्याने त्याचा पाठपुरावा केला.हा फाईल पुढे समाजकल्याण आयुक्तलायकडे पाठवायची असते.प्राप्त माहितीनुसार उपमुख्यमंत्री पवार यांच्या कॉल नंतर जि प समाजकल्याण विभागाने २० ऑगस्टला फाईल आयुक्तालयाच्या कडे पाठवली.ही दिरंगाई या विभागाने का केली? हा प्रश्न आहे.दरम्यान आयुक्तालयाने प्रस्ताव २० ऑगस्ट रोजी मिळाल्याचे सांगून हा प्रस्ताव शासनाकडे पाठविला असल्याचे संबंधितांकडे स्पष्ट केले.गेली अनेक महिन्यांपासून समाजकल्याण विभागाचे अधिकारी सातत्याने निधी नसल्याचा पाढा वाचत होते.बालगृह चालक संस्थेने जि प समाजकल्याण विभागाकडे वेळेत फाईल दाखल केली.मात्र या विभागाने फाईल समाजकल्याण आयुक्तालयाकडे पाठविलीच नाही.बालगृहाने सातत्याने पाठपुरावा केला.मात्र या विभागाने शासनाकडे बोट दाखवण्याचेच काम केले. समाजकल्याण विभागाच्या या हलगर्जीपणा बाबत उपमुख्यमंत्री पवार कदाचित अनभिज्ञ असावेत.प्रस्ताव शासनाकडे असावा व तरीही अनुदान रखडले की काय? असे पवार यांना वाटले असावे.म्हणून त्यांनी दुसऱ्याच दिवशी अनुदान मिळेल असे आश्वासन बालगृहाचे कर्मचारी व मुलींना दिले असावे.दरम्यान अनुदान कधी मिळेल याबाबत अजूनही समाजकल्याण आयुक्तालयाने स्पष्ट केलेले नाही.वास्तविक अजित दादांचा वादा फोल ठरत नाही.असा अनुभव आहे.मात्र समाज कल्याण विभाग अधिकाऱ्यांच्या हलगर्जीपणामुळे विशेष मुलींच्या बालग्रहास अजितदादांनी केलेला वादा फोल ठरला आहे.