आमदारांची घोषणा म्हणजे ‘आयजीच्या जीवावर बायजी उदार ‘- जयश्री पलांडे

0

शिरूरनामा न्यूज नेटवर्क

शिरूर: शिरूर शहरासाठी १५२ कोटींचा निधी आणल्याची आमदार ॲड.अशोक पवार यांची घोषणा म्हणजे ‘आयजीच्या जीवावर बायजी उदार ‘ या उक्तीप्रमाणे असल्याची टीका भाजपाच्या नेत्या जयश्री पलांडे यांनी केली.आमदार विरोधी पक्षाचा असलातरी दूजाभाव न करता निधी दिला जात आहे.याची आमदाराने जाणीव ठेऊन सरकारचा उल्लेख करून त्यांच्याबद्दल कृतज्ञता व्यक्त करायला हवी.असा टोलाही पलांडे यांनी लगावला.
        आमदार पवार यांच्या हस्ते काल(९ मार्च) काल येथे पाबल फाटा ते मोतीनाला या रस्त्याचे भूमिपूजन करण्यात आले.यावेळी त्यांनी शहरात विविध विकास कामांसाठी १५२ कोटींचा निधी आणल्याचे सांगितले.यावर पलांडे यांनी आक्षेप घेत टीका केली.त्या म्हणाल्या,पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या नेतृत्वात देशात व उपमुख्यमंत्री  देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वात राज्यात भाजप प्रणित सरकार आहे.त्यांच्या माध्यमातून ग्रामीण व नागरी विकासाची प्रचंड कामे सुरू असून कोट्यवधींचा निधी गावपातळीपर्यंत पोचत आहे.नितीन गडकरी यांच्या माध्यमातून देशभरात रस्त्यांचे जाळे विणले जात आहे.सर्वसामान्य जनतेला हे ज्ञात आहे.एकूणच विकास करताना आमदार वा खासदार हा विरोधी पक्षाचा आहे असा कसलाही भेदभाव न करता देशात व राज्यात निधीचे वाटप केले जात आहे.हा निधी जेव्हा विरोधी आमदाराच्या मतदारसंघात उपयोगी पडतो.तेव्हा तो आमदार स्वतःला क्रेडिट घेण्याचा प्रयत्न करतो.सरकारने निधी दिल्याचे सांगण्याचा मनाचा मोठेपणा दाखवत नाही.ही दुर्दैवाची गोष्ट असल्याचे पलांडे म्हणाल्या.
        आमदार पवार हे जर १५२ कोटींचा निधी आणल्याचे क्रेडिट घेत असतील तर त्यांनी रावसाहेबदादा पवार घोडगंगा  सहकारी साखर कारखाना सुरू करण्यासाठी तसेच कामगारांचा पगार देण्यासाठी आतापर्यंत निधी का नाही आणला असा सवाल पलांडे यांनी केला.

Leave A Reply

Your email address will not be published.