आमदार पवारांना धमकी देणार्‍यांवर कडक कारवाई करा

सर्वपक्षीय पदाधिकाऱ्यांची मागणी

0

शिरूरनामा न्यूज नेटवर्क

शिरूर:आमदार अशोक पवार यांच्याबद्दल निनावी पत्रात आक्षेपार्ह मजकूर प्रसिद्ध करून त्यांना जिवे मारण्याची धमकी देणाऱ्या नराधमांचा शोध घेऊन त्यांच्यावर योग्य ती कारवाई करावी या मागणीसाठी पोलीस ठाण्यावर सर्वपक्षीय मोर्चा काढण्यात आला. निनावी पत्राद्वारे अशाप्रकारे बदनामी करणाऱ्या व धमकी देणाऱ्या विकृत प्रवृत्तींचा यावेळी निषेध करण्यात आला.आमदार पवार यांना पोलीस संरक्षण देण्याची मागणी यावेळी करण्यात आली.

        आमदार पवार व त्यांची पत्नी जिल्हा परिषदेच्या सदस्य सुजाता पवार, सभागृहनेते प्रकाश धारीवाल यांच्यासह राष्ट्रवादीचे पदाधिकारी तसेच शहरातील काही नगरसेवक यांच्या विषयी बदनामीकारक मजकूर निनावी पत्राद्वारे काल प्रसिद्ध करण्यात आला.टपालाद्वारे शहरातील विविध व्यक्तींना हे निनावी पत्र पाठवण्यात आले.या पत्रात आमदार पवार यांच्या विषयी आक्षेपार्ह मजकूर तर आहेच, मात्र यात आमदार पवार यांना जीवे मारण्याची धमकी दिल्याचा उल्लेख आहे. या पत्राविषयी माहिती मिळताच शहरातील विविध पक्ष संघटनेच्या पदाधिकाऱ्यांनी एकमेकांशी संपर्क साधून याविषयी तीव्र संताप व्यक्त केला.यानिमित्ताने आज नगरपरिषद जवळ सर्वपक्षीय पदाधिकारी एकत्र जमा झाले.नगरपरिषदे पासून निनावी पत्र लिहिणार्‍या विकृत व्यक्तींच्या निषेधाच्या तसेच आमदार पवार व यांच्या समर्थनार्थ घोषणा देत पोलिस ठाण्यावर मोर्चा काढण्यात आला. राष्ट्रवादीचे तालुकाध्यक्ष रवी काळे,शिरूर शहर विकास आघाडीचे अध्यक्ष सुभाष पवार,शहराध्यक्ष मुजफ्फर कुरेशी,जिल्हा परिषद सदस्य राजेंद्र जगदाळे,ॲड.किरण आंबेकर,माजी उपसभापती विश्वास ढमढेरे,वंचित बहुजन आघाडीचे जिल्हाध्यक्ष विनोद भालेराव,मनसेचे जिल्हा उपाध्यक्ष मेहबूब सय्यद, शिक्षण मंडळाचे माजी सभापती तुकाराम खोले,राष्ट्रवादीच्या महिला तालुकाध्यक्ष विद्या भुजबळ,शिवसेना शहर प्रमुख मयूर थोरात आदींनी यावेळी आमदार पवार यांच्याविषयी आक्षेपार्ह मजकूर प्रसिद्ध करणाऱ्यांचा शोध घेऊन त्यांच्यावर कारवाई करण्याची मागणी केली.
           ॲड.सुभाष पवार म्हणाले,निवडून आल्यानंतर आमदार हे एका पक्षाचे नव्हे तर संपूर्ण मतदार संघाचे प्रतिनिधी असतात. केवळ विकासाचा ध्यास असणाऱ्या आमदार पवार यांच्याबद्दल गरळ ओकून निनावी पत्र लिहिणार्‍यांनी आपल्या विकृत मानसिकतेचे दर्शन घडवले आहे.आमदार पवार व सभागृहनेते धारीवाल हे विकासाचे एक समीकरण असून धारिवाल यांच्या दूरदृष्टीतून व आमदार पवार यांच्या सहकार्यातून विकासाचा आलेख उंचावत असल्याचे चित्र आहे.असे असताना वैचारिक दिवाळखोरी असणाऱ्या व्यक्तींनी खालच्या थराला जाऊन आमदार पवार यांच्याविषयीबदनामीकारक मजकूर प्रसिद्ध केला. त्यांना जिवे मारण्याची धमकीही देण्यात आली.अशा विकृत प्रवृत्तींना वेळीच ठेचण्याची गरज असून त्यांचा शोध घेऊन त्यांचा बंदोबस्त करण्याची मागणी यावेळी पवार यांनी केली. रवी काळे म्हणाले,आमदार पवार हे लोककल्याणकारी लोकप्रतिनिधी असून अशा लोकप्रतिनिधीला चौकात मारण्याची धमकी देणे हा गंभीर प्रकार आहे.अशा परिस्थितीत पोलिसांनी आमदार पवार यांना संरक्षण देण्याची गरज आहे.आमदार पवार अशा धमक्यांना भीक घालणार नाहीत.ते संरक्षणही स्वीकारणार नाहीत.मात्र त्यांनी संरक्षण घेतले पाहिजे असे मत काळे यांनी व्यक्त केले.यावेळी काळे यांनी भ्रमणध्वनीवर पुणे ग्रामीणचे पोलीस अधीक्षक डॉ.अभिनव देशमुख यांच्याशी संपर्क साधून आमदार पवार यांना संरक्षण देण्याची मागणी केली.सर्वच वक्त्यांनी अशाप्रकारची एकमुखी मागणी केली.निनावी पत्र लिहिणार्‍यांचा शोध घेऊन त्यांच्यावर कडक कारवाईची मागणीही या वेळी करण्यात आली. शिरूर नगरपरिषदेची निवडणूक काही महिन्यांवर येऊन ठेपली असून काही षंड प्रवृत्तीचे लोक आपली राजकीय पोळी भाजून घेण्यासाठी आमदार पवार व सभागृहनेते धारिवाल यांच्यात दरी निर्माण करण्याचा केविलवाणा प्रयत्न करण्यात असल्याचे मुजफ्फर कुरेशी म्हणाले.
          शिरूर शहर विकास आघाडीचे नेते संतोष भंडारी, माजी नगराध्यक्ष रवींद्र ढोबळे, शिक्षण मंडळाचे माज सभापती संतोष शितोळे,नगरसेवक सचिन धाडीवाल,मंगेश खांडरे,माजी नगरसेवक दादाभाऊ वाखारे,निलेश लटांबळे,आबिद शेख,राष्ट्रवादी युवकचे शहराध्यक्ष रंजन झांबरे,मराठा महासंघाच्या तालुकाध्यक्षा शशिकला काळे, राष्ट्रवादी युवती तालुकाध्यक्षा संगीता शेवाळे,शहराध्यक्षा तज्ञिका कर्डिले, रामलिंग महिला संस्थेच्या अध्यक्ष राणी कर्डिले,वकील संघटनेचे शहराध्यक्ष अँड.प्रदीप बारवकर,समता परिषदेचे किरण बनकर, जयवंत साळुंके,जगन्नाथ पाचर्णे,आरपीआयचे शहराध्यक्ष निलेश जाधव,रिक्षा पंचायतीचे अध्यक्ष अनिल बांडे,मनसेचे जिल्हा पदाधिकारी सुशांत कुटे,तालुकाध्यक्ष स्वप्नील माळवे,मनसे शहराध्यक्ष अविनाश घोगरे,आपचे शहराध्यक्ष अनिल डांगे राष्ट्रवादीचे तालुका उपाध्यक्ष अमोल वर्पे,रुपेश घाडगे,शहर युवक कार्याध्यक्ष हाफिज बागवान,माजी शहराध्यक्ष निलेश पवार,सागर पांढरकामे,रजुद्दिन सय्यद,सागर नरवडे,राहील शेख,शंतनू खांडरे,काँग्रेसचे शहर उपाध्यक्ष अमजद पठाण,दादाभाऊ लोखंडे,भाजपाचे विजय नरके,आदी यावेळी उपस्थित होते.

Leave A Reply

Your email address will not be published.