शिरूरनामा न्यूज नेटवर्क
शिरूर तालुका काँग्रेस कमिटीच्या वतीने तळेगाव ढमढेरे येथे घेण्यात आलेल्या बैठकीत विधानसभा निवडणुकीत महाविकास आघाडीचे उमेदवार आमदार अशोक पवार न करण्याचा ठराव घेण्यात आला. यावेळी आमदार पवारांना भ्रष्ट म्हणतानाच त्यांनी काँग्रेसच्या पदाधिकारी व कार्यकर्त्यांना नेहमीच द्वेष पूर्ण वागणूक दिली. त्यांचे खच्चीकरण करण्याचा प्रयत्न केला.असा आरोप करण्यात आला.
महाविकास आघाडीच्या वतीने आज अशोक पवार यांनी आपला अर्ज दाखल केला. यावेळी महाविकास आघाडीत सहभागी असलेले काँग्रेस कुठेही दिसून आले नाही.आजच तळेगाव ढमढेरे येथे
कृषी उत्पन्न बाजार समितीचे माजी सभापती अरविंददादा ढमढेरे यांच्या अध्यक्षतेखाली तालुका काँग्रेसची बैठक घेण्यात आली. या बैठकीत आमदार पवार यांच्यावर जोरदार टीका करण्यात आली.२००९,२०१९ मधील विधानसभा निवडणुकीत आमदार पवार यांचे तसेच लोकसभा निवडणुकीत खासदार अमोल कोल्हे यांचे काँग्रेस कार्यकर्त्यांनी निष्ठेने व प्रामाणिकपणे काम केल्यामुळे हे दोघेही मोठ्या मताधिक्याने निवडून आले. निवडणुका नंतर मात्र स्थानिक स्वराज्य, सहकारी संस्था असो अथवा शासन स्तरावरील विविध समित्यांतील नियुक्ती असो काँग्रेस कार्यकर्त्यांना पवार यांनी नेहमीच डावलले.गेल्या पंधरा वर्षातील परिस्थिती पाहता, आमदार पवार यांनी काँग्रेस पक्षाच्या पदाधिकारी व कार्यकर्त्यांना नेहमीच द्वेषपूर्ण,सापत्नभावाची वागणूक दिल्याचे दिसून आले.
. तालुक्याची कामधेनु समजले जाणाऱ्या रावसाहेब दादा पवार कडू गंगा सहकारी साखर कारखाना बंद पाडून २१ हजार सभासद व ७०० कामगारांचे प्रपंच देशोधडीला लावण्याचे काम आमदार पवार यांनी केल्याचे गाऱ्हाणे यावेळी मांडण्यात आले.कारखाना बंद पाडून वाम मार्गाने कमावलेल्या पैशातून ते आता निवडणूक रिंगणात उतरले असल्याचा आरोपही यावेळी करण्यात आला. त्यांच्या विरोधात जनतेमध्ये प्रचंड रोष असून अशा उमेदवाराचा प्रचार कोणत्या तोंडाने आम्ही करायचा असा प्रश्न निर्माण झाल्याने तालुका काँग्रेसने आमदार पवार यांचा प्रचार न करण्याचा ठराव केल्याचे यावेळी सांगण्यात आले.अनेकांनी यावेळी संतप्त भावना व्यक्त केल्या.
तालुका काँग्रेसचे अध्यक्ष वैभव यादव,पुणे जिल्हा काँग्रेसचे खजिनदार महेश ढमढेरे ,शिरूर हवेली विधानसभा अध्यक्ष संतोष गव्हाणे, तालुका काँग्रेसचे उपाध्यक्ष डॉ. सुजित शेलार,शिरूर तालुका महिला काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष प्रियांकाताई बंडगर शिरूर तालुका ओबीसी काँग्रेसचे अध्यक्ष अमोल घुमे, उपाध्यक्ष सचिन पंडित,शिरूर हवेली विधानसभा काँग्रेस कमिटीचे उपाध्यक्ष प्रवीण शिंदे,सचिव रशीद भाई शेख ,रामदास धुमाळ, निलेश वाघ ,विजय गव्हाणे ,सतीश गव्हाणे, युवराज चव्हाण, विशाल शिंदे, प्रफुल्ल आल्हाट,प्रशांत गायकवाड, ग्रामपंचायत सदस्य मनोज आल्हाट,मच्छीमार संघटनेचे अध्यक्ष अमोल पवार, माजी ग्रामपंचायत सदस्य माऊली अल्हाट , सरचिटणीस बजरंग होळकर,युवराज सातव अविनाश घारे, ज्ञानेश्वर डाके, संतोष गायकवाड, गुलाब धुमाळ ,मोतीराम भुमरे ,शांताराम मोरे तसेच शिरूर हवेलीतील असंख्य कार्यकर्ते उपस्थित होते शेवटी विद्यार्थी काँग्रेसचे तालुकाध्यक्ष मयूर चव्हाण यांनी आभार मानले