उपेक्षितांच्या चेहर्यावर समाधानाचे भाव उमटवून संत रविदास जयंती साजरी
संत रविदास जयंती उत्सव समितीच्या वतीने विविध कार्यक्रमांचे आयोजन
शिरूरनामा न्यूज नेटवर्क
शिरूर: आपल्या अध्यात्मिक वचनातून जगाला आत्मज्ञान,एकता व भाईचाऱ्याचा संदेश देणाऱ्या संत शिरोमणी रविदास जयंतीनिमित्त संत रविदास जयंती उत्सव समितीच्या वतीने विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले.जयंतीसाठीचा अनावश्यक खर्च टाळून सिंधुताई संकपाळ यांच्या मन:शांती संस्थेतील मुलांना मिठाई,फळे व मास्कचे वाटप करून त्यांच्या चेहऱ्यावर समाधानाचे भाव उमटवण्याचा प्रयत्न समितीच्यावतीने करण्यात आला.
संत रविदास जयंती उत्सव समितीच्या वतीने येथील सिद्धेश्वर पहाडावर वृक्षारोपण करण्यात आले. संत रविदास यांची जयंती शासकीय कार्यालयात साजरे करण्याचे शासनाचे निर्देश आहेत.सर्व शासकीय कार्यालयात संत रविदास यांची जयंती साजरी व्हावी म्हणून समितीच्या वतीने सर्व शासकीय कार्यालयांना संत रविदास यांची प्रतिमा भेट देण्यात आली.उपेक्षितांप्रति संवेदना जागृत ठेवण्याची संतांची शिकवण आहे.या शिकवणीनुसार समितीने जयंतीसाठी लागणारा अनावश्यक खर्च टाळून सिंधुताई सपकाळ यांच्या मन:शांती संस्थेतील मुलांना मिठाई फळे व मास्कचे वाटप केले.संत रोहिदास यांची शिकवण व त्यांच्या कार्याविषयी यावेळी मुलांना माहिती देण्यात आली.समितीचे अध्यक्ष तुषार वेताळ,मार्गदर्शक मधुकर सातपुते, राजू घोडके,रमेश साळुंखे,भगवान दळवी, कचरदास रोकडे,हरिभाऊ इसवे,समिती सदस्य सागर गायकवाड,स्मिता ईसवे,स्वप्नील वेताळ,सतोष पाखरे, संतोष साळी,माधव कौठकर,किरण जंगम,अनिल गायकवाड,रामभाऊ वीर आदी यावेळी उपस्थित होते.