शिरूरनामा न्यूज नेटवर्क
शिरूर:मकर संक्रातीच्या निमित्तानं येथील युवा स्पंदनच्या सदस्यांनी भिल्ल वस्तीतील महीलांसमवेत हळदी कुंकवाचा कार्यक्रम साजरा केला.उपेक्षित घटकांप्रति असलेली ही जाणीव पाहता युवा स्पंदने तेथील महिलांना सामाजिक जाणिवेचे ‘वाण’ दिले असे म्हटल्यास वावगे ठरणार नाही.
संक्रांतीनिमित्त सर्वत्रच हळदी-कुंकवाच्या कार्यक्रमाचे आयोजन केले जाते.वस्तूरुपी वाणाचे वाटप करण्यात येते.वैयक्तिक तसेच सामूहिकरीत्या साजरा होणाऱ्या या आनंद सोहळ्यापासून उपेक्षित घटक वंचित राहू नयेत या हेतूने युवा स्पंदनने येथील भिल्ल वस्तीत हळदी कुंकुवाच्या कार्यक्रमाचे आयोजन केले.तेथील महिलांना वस्तूरुपी वाण देण्यात आले.मात्र हे एक प्रकारे सामाजिक जाणिवेचे वाण आहे.असे म्हटले पाहिजे. वर्षभर विविध सण उत्सव साजरे होत असतात.आर्थिक दुर्बलतेमुळे समाजातील अनेक घटक हे सण उत्सव साजरे करू शकत नाहीत.हे घटकही आपल्या समाजाचा अविभाज्य भाग आहे.हे समजून त्यांना या सणउत्सवाचा आनंद देणारी,सामाजिक जाणिवा असलेली विविध स्तरातील मंडळी आपल्या समाजात आहेत.हेच युवा स्पंदनने या कार्यक्रमाच्या आयोजनातून दाखवून दिले आहे.युवा स्पंदने या महिलांप्रती दाखवलेली आपुलकीची भावना पाहून या महिलाही भारावून गेल्या.अशी भावना कायम जोपासण्याचा दिलासा देऊन युवा स्पंदनने कार्यक्रमाचा समारोप केला.युवा स्पंदनच्या प्रमुख प्रियांका धोत्रे,कल्याणी फुलफगर ,गौरी काळे,स्वाती थोरात,मनिषा भारती, कोमल रणखांबे आदी यावेळी उपस्थित होते.