पोपटराव गावडे निस्वार्थी सेवेचे प्रतीक-शरद पवार

0

शिरूरनामा न्यूज नेटवर्क

शिरूर:गेली साठ वर्षे सातत्याने कसलाही स्वार्थ न ठेवता अखंडपणे जनतेची सेवा करण्याचा एक कलमी कार्यक्रम राबवणाऱ्या माजी आमदार पोपटराव गावडे यांच्या सहस्त्रचंद्र सोहळ्यास उपस्थित राहता आल्याचे आपणास समाधान आहे असे गौरवोद्गार राष्ट्रवादीचे अध्यक्ष माजी कृषिमंत्री शरद पवार यांनी येथे काढले.

         माजी आमदार पोपटराव गावडे यांच्या सहस्त्रचंद्र सोहळ्या निमित्त त्यांचा सपत्नीक पवार यांच्या हस्ते सन्मानचिन्ह देऊन सत्कार करण्यात आला.या वेळी पवार बोलत होते. राज्याचे गृहमंत्री दिलीप वळसे-पाटील कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी होते.ग्रामविकास मंत्री दत्ता भरणे, राज्याचे माजी मंत्री अण्णासाहेब डांगे, राज्य महिला आयोगाच्या अध्यक्षा रुपाली चाकणकर,खासदार अमोल कोल्हे, आमदार अशोक पवार,निलेश लंके,माजी आमदार सूर्यकांत पलांडे,पांडुरंग अभंग,रमेश थोरात,प्रसिद्ध उद्योगपती प्रकाश धारिवाल,राष्ट्रवादीचे जिल्हाध्यक्ष प्रदीप गारटकर,जिल्हा परिषदेच्या सदस्य सुजाता पवार, सुनीता गावडे,राजेंद्र जगदाळे,स्वाती पाचुंदकर,सविता बगाटे,पंचायत समितीच्या सभापती मोनिका हरगुडे,दूध संघाच्या संचालिका केशरताई पवार,शरद लेंडे,वैशाली पाटील,उस्मानाबादच्या जिल्हा परिषद सदस्य सक्षणा सलगर,बाजार समितीचे सभापती काकासाहेब कोरेकर, उपसभापती प्रवीण चोरडिया,खरेदी-विक्री संघाचे सभापती राजेंद्र नरवडे,बालाजी शिक्षण संस्थेचे अध्यक्ष सदाशिवराव पवार,देवदत्त निकम,पंडित दरेकर,माजी नगराध्यक्ष मनीषा गावडे यांच्यासह विविध क्षेत्रातील मान्यवर यावेळी उपस्थित होते.
           पवार म्हणाले,राजकारणात समृद्धीच्या मार्गावर नेण्याची कुवत असणारी चांगली माणसं शोधावी लागतात, त्यांचे कर्तुत्व ओळखून त्यांना ताकद देण्याचे काम करावे लागते.गावडे यांचे कर्तृत्व ओळखून त्यांना ताकद देण्याचे काम केले.त्यांनीही आपले कर्तृत्व सिद्ध केले.जनतेनेही गावडेंच्या कर्तुत्वाला साथ दिली.त्यामुळे शिरूर तालुक्याचे चित्र बदलले.एकेकाळी दुष्काळी ओळख असलेला शिरूर तालुका बारामती तालुक्यापेक्षा अधिक बागायती क्षेत्र असलेला तालुका म्हणून ओळखला जाऊ लागला.समाजाला एक दृष्टी देणाऱ्या,स्वच्छ चारित्र राखून अखंडपणे सामान्य माणसाची बांधिलकी ठेवणाऱ्या गावडे यांसारख्या नेत्याच्या सहस्त्रचंद्र सोहळ्यास आपल्याला उपस्थित राहायचे खरोखर समाधान आहे.असे गौरवोद्गार पवार यांनी यावेळी काढले.१९६२ पासून माजी गृहराज्यमंत्री बापूसाहेब थिटे गावडे यांच्यासमवेत केलेल्या कामांची आठवण पवार यांनी यावेळी सांगितली.रांजणगाव औद्योगिक वसाहतीबाबतची आठवण सांगताना गावडे यांच्या विधायक कामांना पाठिंबा देण्याच्या प्रवृत्तीमुळे रांजणगाव औद्योगिक वसाहत होऊ शकल्याचे पवार यांनी सांगितले.
         गावडे यांनी पक्ष,पवारसाहेब व कामाप्रती निष्ठा  ठेवून सातत्याने रात्रंदिवस काम केल्याचे वळसे पाटील म्हणाले. ते म्हणाले, गावडे यांनी आपल्या राजकीय कारकीर्दीत जनतेचे प्रश्‍न सोडवण्याचा व विकासाचा ध्यास घेऊन आपली वाटचाल केली.सर्वसामान्य कुटुंबातून आलेल्या या नेत्याचे वय वर्ष ८० पूर्ण होत असताना त्यांनी आपल्या कर्तृत्वातून जनतेचे प्रेम मिळवले हेच आजच्या उपस्थितीवरून निदर्शनास येते. आमदार पवार म्हणाले,वयाच्या ऐंशीव्या वर्षातही गावडे समाजसेवेसाठी झटत असून पवार साहेबांच्या नेतृत्वाखाली त्यांनी तालुक्याचा विकास तसेच बेटाचे नंदनवन केले.गावडे यांनी नेहमीच दिलेला शब्द पाळण्याचे काम केले.दरम्यान दत्तात्रय जगताप व शिरूर तालुका मराठी पत्रकार संघाचे अध्यक्ष संजय बारहाते लिखित ‘कर्मयोगी पोपटराव तथा बापूसाहेब गावडे’या पुस्तकाचे मान्यवरांच्या हस्ते प्रकाशन करण्यात आले.
          आंबेगाव राष्ट्रवादीचे अध्यक्ष मानसिंग पाचुंदकर, भीमाशंकर कारखान्याचे संचालक प्रदीप वळसे-पाटील व घोडगंगा कारखान्याचे संचालक राजेंद्र गावडे यांनी कार्यक्रमाचे नियोजन केले. राजेंद्र गावडे यांनी प्रास्ताविक केले,निलेश पडवळ यांनी सूत्रसंचालन केले तर सुनिता गावडे यांनी आभार मानले.
आपल्या सत्काराला उत्तर देताना माजी आमदार गावडे म्हणाले,पवार साहेबां सारखे खंबीर नेतृत्व लाभल्याने सत्तेचा पुरेपूर वापर करून तालुक्याचे चित्र बदलू शकलो.५० ते ६० वर्षाच्या कारकिर्दीत सामाजिक,शैक्षणिक व आरोग्य विषयक प्रश्न मार्गी लागून परिवर्तन करण्याचा प्रामाणिक प्रयत्न केला. सामान्य कुटुंबातील असताना तसेच फार मोठी पार्श्वभूमी नसताना केवळ काम करण्याची जिद्द असल्याने जनतेचे प्रश्‍न सोडवू शकलो.बेट भागाने आयुष्यभर फार मोलाची साथ दिल्याचे आवर्जून सांगताना जीवात जीव असेपर्यंत जनतेच्या सेवेत राहणार असल्याचा निर्धार गावडे यांनी यावेळी व्यक्त केला.
गावडे यांची शतकपूर्ती साजरी व्हावी व शरद पवार यांच्याच हस्ते त्यावेळी त्यांचा सत्कार व्हावा अशा सदिच्छा सर्वच मान्यवरांनी दिल्या.

Leave A Reply

Your email address will not be published.