राज्यातील रुग्णालयांचे फायर ऑडिट करावे लागेल -महसूल मंत्री बाळासाहेब थोरात

राज्यघटनेचे मूलभूत तत्व हेच काँग्रेसचे तत्वज्ञान

0
शिरूरनामा न्यूज नेटवर्क

शिरूर:कोरोनाच्या संकटामुळे तातडीची गरज म्हणून राज्यात विविध ठिकाणी रुग्णालयांमध्ये अतिदक्षता कक्ष सुरू करण्यात आले.यामुळे याचे घाईने फायर ऑडिट करणे शक्य झाले नाही.मात्र अहमदनगर जिल्हा रुग्णालय व विरार येथील खासगी रुग्णालयामधिल घटना पाहता खाजगी व सरकारी रुग्णाललयांचे निश्चितपणे फायर ऑडिट करावे लागेल असे महसूल मंत्री बाळासाहेब थोरात यांनी पत्रकारांशी बोलताना स्पष्ट केले.

         व्हिजन केअर सेंटर सुपर स्पेशालिटी हॉस्पिटलच्या लॅसिक लेसर सेंटरचे लोकार्पण महसूलमंत्री थोरात यांच्या हस्ते करण्यात आले.यावेळी महसूल मंत्री थोरात यांनी पत्रकारांशी संवाद साधला.अहमदनगर जिल्हा रुग्णालयात अतिदक्षता कक्षात लागलेल्या आगीत अनेकांना आपले प्राण गमवावे लागले.यात रुग्णालयाचे फायर ऑडिट करण्यात आले नव्हते.असा मुद्दा समोर आला आहे.याबाबत थोरात म्हणाले,कोरोनाच्या संकटामध्ये मोठ्या प्रमाणावर रुग्णांची संख्या वाढत होती.अशा परिस्थितीत त्यांच्यावर तातडीने उपचार करणे गरजेचे होते.यामुळे राज्यात अनेक ठिकाणी तातडीने रुग्णालयांमध्ये अतिदक्षता वॉर्ड तयार करण्यात आले.परिणामी घाईने फायर ऑडिट करणे शक्य झाले नाही.अहमदनगर जिल्हा रुग्णालय येथील घटना असो वा विरारची खासगी रुग्णालयातील घटना असो.दोन्ही घटना दुर्दैवी आहेत.या घटना पाहता खासगी व शासकीय रुग्णालयांचे फायर ऑडिट करावे लागेल.केले जातील.असे थोरात यांनी यावेळी स्पष्ट केले.
          राज्यात नुकत्याच झालेल्या पोटनिवडणुकीत काँग्रेसला चांगले यश याबाबत विचारले असता,थोरात यांनी आपली भूमिका स्पष्ट केली.ते म्हणाले कधी कधी काही लाटा येतात, लोकांना भावनिक करून सत्तेची पोळी भाजण्याचा प्रयत्न केला  जातो.माणसामाणसांमध्ये भेद निर्माण करून मते मिळवली जातात.अशा पद्धतीचे काँग्रेसचे तत्त्वज्ञान नाही.काँग्रेस पक्षाने अनेक चढ-उतार पाहिले आहेत. मात्र काँग्रेसने कधीही आपल्या तत्त्वज्ञानाशी तडजोड केली नाही.काँग्रेस केवळ पक्ष नसून तो एक विचार आहे.ज्याला संपवणं कुणालाच शक्य नाही.आमची तत्व हेच आमच्या यशाचे गमक आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.