शिरूर:’धारीवाल आले दारी आणि आमची दिवाळी गोड झाली सारी..’गेली पन्नास वर्षाहून अधिक काळ शहरातील झोपडपट्टीवासीयांच्या तोंडी हे वाक्य असावे. याचे कारण गेली पन्नासहून अधिक वर्ष धारीवाल कुटुंबियांच्या वतीने शहरातील झोपडपट्टीवासीयांना मिठाईचे वाटप करून त्यांची दिवाळी गोड करण्याचा स्तुत्य प्रयत्न केला जात आहे.
शिरूरचे माजी नगराध्यक्ष माणिकचंद धारीवाल यांनी दिवाळी सणाच्या आनंदापासून कोणीही वंचित राहू नये म्हणून पन्नास वर्षांपूर्वी शहरातील झोपडपट्टीवासीयांना मिठाईचे वाटप करण्याची परंपरा सुरू केली.त्यांच्यानंतर त्यांचे सुपुत्र,आपल्या दातृत्वाबद्दल संपूर्ण देशात प्रसिद्ध असलेले जागतिक कीर्तीचे उद्योगपती रसिकलाल धारीवाल यांनी ही परंपरा सुरू ठेवली.रसिकभाऊ यांचे सुपुत्र प्रकाश धारीवाल ही परंपरा अखंडितपणे जोपासत आहेत.दातृत्वाचा हा वारसा प्रकाश भाऊंचे सुपुत्र आदित्य धारीवाल हे आपल्या वडिलांच्या खांद्याला खांदा लावून पुढे नेताना दिसत आहेत.आज प्रकाश भाऊ आदित्य या पिता-पुत्राने शहरातील सर्व झोपडपट्टी परिसरात जाऊन स्वतः मिठाईचे वाटप केले.धारीवाल यांच्या याआदर्शवत उपक्रमाचे साक्षीदार बनण्यासाठी त्यांचे समर्थक दरवर्षी त्यांच्यासमवेत गर्दी करताना दिसतात.माजी उपनगराध्यक्ष जाकीर खान पठाण,माजी नगराध्यक्ष रवींद्र ढोबळे,खरेदी-विक्री संघाचे माजी सभापती शरद कालेवार,नगर परिषद बांधकाम समिती सभापती सभापती अभिजीत पाचर्णे,पाणी पुरवठापाणी पुरवठा समिती सभापती मुजफ्फर कुरेशी,स्वच्छता व आरोग्य समिती सभापती विठ्ठल पवार,नगरसेवक सचिन धाडीवाल,संदीप गायकवाड,संजय देशमुख माजी नगरसेवक दादाभाऊ वाखारे,प्रवीण दसगुडे,निलेश लटांबळे,अशोक पवार,आबिद शेख,शिक्षण मंडळाचे माजी सभापती संतोष शितोळे,तुकाराम खोले,माजी सदस्य प्रशांत शिंदे,जयवंत साळुंके,मनसे जनहित कक्षाचे जिल्हाध्यक्ष सुशांत कुटे,आरपीआयचे शहराध्यक्ष निलेश जाधव,समता परिषदेचे किरण बनकर,मराठा महासंघाचे सचिन जाधव,राष्ट्रवादीचे सागर पांढरकामे,सागर नरवडे,काँग्रेसचे शहर उपाध्यक्ष अमजद पठाण,उद्योजक भरत कालेवार,राजेंद्र लोळगे,सुभाष गांधी,आशिष शिंदे,सुनील बोरा,दीपक तातेड,मयूर नहार,अमजद शेख,रवी गोसावी,तुषार जांभळे,वसीम सय्यद,निलेश कोळपकर आदी यावेळी उपस्थित होते.