संजय गांधी निराधार योजना समितीवर रामभाऊ शेटे यांची नियुक्ती

0

शिरूरनामा न्यूज नेटवर्क

शिरूर:संजय गांधी निराधार अनुदान योजना समितीवर सार्वजनिक बांधकाम विभागाचे निवृत्त उपअभियंता राम अर्जुनराव शेटे यांची नियुक्ती करण्यात आली आहे.

        उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या शिफारशीनुसार  शासन निर्णय २० ऑगस्ट २०१९ अन्वये शासकीय आदेशानुसार संजय गांधी निराधार अनुदान योजना समितीवर अशासकीय सदस्यांची नेमणूक करण्यात आली आहे.या आदेशानुसार शिरुर तालुक्यासाठी शेटे यांची नियुक्ती करण्यात आली आहे.नुकतेच  प्रशासनाच्या वतीने त्यांना नियुक्तीचे पत्र देण्यात आले. संजय गांधी निराधार योजनेचे शिरूर तालुक्यामध्ये ७२४८ लाभार्थी असून या लाभार्थ्यांना वर्षाला प्रत्येकी बारा हजार रुपयांचा लाभ मिळत आहे.आमदार ॲड.अशोक पवार यांच्या मार्गदर्शनाखाली ही समिती उत्तम प्रकारे काम करीत आहे.निराधारांसाठी काम करणाऱ्या अशा महत्त्वाच्या समितीवर शेटे यांची नियुक्ती करण्यात आली आहे.आमदार पवार यांचे निकटवर्तीय असणाऱ्या शेटे यांनी ३६ वर्ष पंचायत समितीमध्ये शाखा अभियंता तर निवृत्ती पूर्वीचे एक वर्ष सार्वजनिक बांधकाम विभागाचे उपअभियंता म्हणून काम केले आहे आहे.शेटे यांनी आपल्या कार्यकालामध्ये नियोजनबद्ध व वैशिष्ट्यपूर्ण सेवा देऊन आपल्या कामाचा ठसा उमटवला आहे. निवृत्तीनंतर त्यांनी स्वतःला सामाजिक कार्यात गुंतवून घेतले असून छत्रपती सहकारी गृहरचना संस्थेचे संचालक म्हणून ते कार्यरत आहेत.नुकतेच त्यांनी आपल्या वाढदिवसानिमित्त सामाजिक बांधिलकीच्या जाणिवेतून शिरूर व हवेली मतदार संघात कोविड केअर सेंटर उभारून उल्लेखनीय कार्य करणाऱ्या रावलक्ष्मी फाउंडेशनला ५१ हजार रुपयांची देणगी दिली.सकल मराठा समाजाच्या वतीने लोकार्पण करण्यात आलेल्या जिजामाता रुग्णवाहिकेसाठी देखील शेटे यांनी २१ हजारांची देणगी दिली.शेटे यांचे वडील अर्जुनराव शेटे यांचे तालुक्यात राजकीय व सामाजिक क्षेत्रात मोठे योगदान असून त्यांचाच वारसा राम शेटे हे नेटाने पुढे नेत आहेत.
         संजय गांधी निराधार अनुदान योजना समितीवर अशासकीय सदस्य म्हणून झालेली माझी नियुक्ती माझ्यासाठी एक चांगले काम करण्याची संधी असून त्यास मी न्याय देण्याचा प्रयत्न करणार आहे.अशी प्रतिक्रिया शेटे यांनी दिली.
 

Leave A Reply

Your email address will not be published.