स्वच्छता निरीक्षकाच्या तत्परतेमुळे नागरिकास मिळाला कचर्यात गेलेला दागिन्यांचा डबा
नागरिकाने मानले नगरपरिषदेचे आभार
शिरूर:अनावधानाने कचऱ्याच्या घंटागाडीत टाकला गेलेला दागिने व रोख रकमेचा डबा स्वच्छता निरीक्षकाच्या तत्परतेमुळे संबंधित नागरीकास सुरक्षित पुन्हा मिळाला.हा डबा मिळाल्याने संबंधित नागरिकाने स्वच्छता विभाग व नगरपरिषदेनेबद्दल कृतज्ञता व्यक्त केली.