सत्कार्यातून जन्मदिवस साजरा

संदीप वर्पे यांची कोविड केअर सेंटरला ५१ हजार रुपयांची देणगी

0
शिरूरनामा न्यूज नेटवर्क

शिरूर:कोरोना महामारीच्या संकटमय परिस्थितीत नेहमीप्रमाणे वाढदिवस साजरा न करता येथील क्रांती एंटरप्राईजेस चे संचालक,उद्योजक संदीप वर्पे यांनी शिरूर-हवेलीमध्ये कोविड केअर सेंटर उभारण्यासाठी महत्वाचे योगदान देणाऱ्या रावलक्ष्मी फाऊंडेशनला५१ हजार रुपयाची मदत करून वाढदिवस सत्कारणी लावला.
        परिस्थितीची जाण असणार्‍यांची संख्या कमी असली तरी,ज्यांना आहे त्यांच्यामुळे समाजात चांगल्या गोष्टी घडत असतात.सध्या सर्वजण कोरोनाच्या संकटमय परिस्थितीतून जात आहेत.रुग्णालय,कोविड केअर सेंटर्स रुग्णांनी भरलेली आहेत.हे संकट केव्हा कमी होईल, याबाबत शाश्वती नाही.तिसरी लाट येण्याचीही शंका व्यक्त करण्यात आली आहे. अशा परिस्थितीत समाजभान राखून आचरण करणे गरजेचे आहे. वर्पे यांनी समाजभान राखत नेहमीप्रमाणे वाढदिवस साजरा करण्याला फाटा देऊन वाढदिवस सत्कारणी लावण्याचा निर्णय घेतला.राव लक्ष्मी फाउंडेशन फाउंडेशन ने शिरूर-हवेली मध्ये अनेक  ठिकाणी कोविड केअर सेंटर्स सुरू केली असून या सेंटरमुळे शिरूर-हवेलीतील रुग्णांना मोठा दिलासा मिळाला आहे.रावलक्ष्मी फाउंडेशन करीत असलेल्या या सत्कार्याला आपलाही हातभार लागावा या हेतूने वर्पे
 यांनी फाऊंडेशनला ५१ हजार रुपयांची देणगी दिली. आमदार अशोक पवार यांच्याकडे त्यांनी धनादेश सुपूर्त केला.शिरूर ग्रामीण चे माजी उपसरपंच बाबाजी वर्पे, भरत बोऱ्हाडे,पत्रकार सतीश डोंगरे निलेश बोऱ्हाडे आदी यावेळी उपस्थित होते.वाढदिवस सत्कारणी लागल्याची भावना यावेळी वर्पे यांनी व्यक्त केला. संदीप व त्यांचे ज्येष्ठ बंधू बाबाजी वर्पे यांचा सातत्याने विविध सामाजिक उपक्रमात सहभाग असतो.

Leave A Reply

Your email address will not be published.