मनसे जनहित कक्षाच्यावतीने अंध अपंगांना किराणा किटचे वाटप

0

शिरूरनामा न्यूज नेटवर्क

शिरूर:मनसे नेते अमित ठाकरे यांच्या वाढदिवसानिमित्त पुणे जिल्हा मनसे जनहित कक्षाच्या वतीने शिरूर तालुक्यातील अडीचशे अंध-अपंग निराधार कुटुंबांना किराणा किटचे वाटप करण्यात आले.कोरोनामुळे आधीच डबघाईला आलेली आर्थिक परिस्थिती,त्यातच अंध अपंगत्व व निराधार. यामुळे पिचलेल्या या घटकांना मनसे जनहीत कक्षामुळे काहीसा आधार मिळाला.

        कोरोनाच्या संकटामुळे विविध घटक अडचणीत सापडले आहेत.काम बंद असल्यामुळे हातावरचे पोट असलेले अनेक घटक परेशान आहेत.अंध अपंग व निराधार कुटुंबांची अवस्था तर फार गंभीर आहे. तालुक्यातील या कुटुंबांच्या समस्येसंदर्भात मनसे जनहित कक्षाला माहिती प्राप्त झाल्यावर त्यांनी या घटकांना मदत करण्याचा निर्णय घेतला. मनसेचे नेते अमित ठाकरे यांच्या वाढदिवसाचे औचित्य साधून  पुणे जिल्हा मनसे जनहीत कक्षाच्या वतीने तालुक्यातील अडीचशे कुटुंबांना किराणा किटचे वाटप करण्यात आले. सध्याच्या अडचणीच्या काळात मनसे कडून मिळालेली ही मदत या कुटुंबांसाठी लाख मोलाची ठरली.मनसे जनहित कक्षाप्रमाणे समाजातील इतरही सामाजिक भान राखणारे घटक अशा उपेक्षित घटकांना मदतीसाठी पुढे आल्यास तालुक्यातील असे उपेक्षित घटक मदतीपासून वंचित राहणार नाहीत.सुशांत कुटे,रवींद्र गुळादे,अमोल बोरहाडे,प्रितम जाधव,साहील काटे आदींच्या उपस्थितीत किराणा किटचे वाटप करण्यात आले.

Leave A Reply

Your email address will not be published.