आमदार पवार दाम्पत्यामुळे कोविड केअर सेंटर्समधील रुग्णांचा सण गोड   

रुग्णांना पुरणपोळी व शीरखुर्माची मेजवानी

0
शिरूरनामा न्यूज नेटवर्क

शिरूर:अक्षय तृतीया,रमजान ईद व छत्रपती संभाजी महाराज जयंतीचे औचित्य साधून आमदार अशोक पवार,जिल्हा परिषद कृषी व पशुसंवर्धन खात्याच्या माजी सभापती सुजाता पवार या दाम्पत्याच्या व रावलक्ष्मी फाउंडेशनच्या वतीने शिरूर-हवेलीतील सर्व प्रतिभा आरोग्य केंद्रातील (कोविड केअर सेंटर)  रुग्णांचा सण गोड करण्यासाठी पुरणपोळीची मेजवानी देण्यात आली.आज संध्याकाळी या रुग्णांना शीरखुर्माचीही मेजवानी देण्यात येणार आहे.

         शिरूर हवेली मतदार संघातील विविध भागात राव लक्ष्मी फाउंडेशन व पवार दांपत्याच्या माध्यमातून कोविड केअर सेंटर्स उभारण्यात आली आहेत.सुजाता पवार यांनी वैयक्तिकरित्या लक्ष घालून ही कोविड केअर सेंटर उभारण्यासाठी योगदान दिलेले आहे. या सर्व कोविड केअर सेंटर्स मध्ये रुग्णांना मिळणारी सेवा, सकस आहार हा सर्वत्र कौतुकाचा विषय झाला आहे. आमदार पवार व सुजाता पवार या दाम्पत्याने केवळ सेंटर्स उभारली नसून वेळोवेळी तेथे जाऊन रुग्णांना उभारी देण्याचा प्रयत्न केला आहे. या सेंटर मधील आपुलकी तसेच माणुसकीचे वातावरण पाहून रुग्ण लवकरात लवकर बरे झाल्याचे दिलासादायक चित्र आहे.आज संभाजी महाराज जयंती,अक्षय तृतीया तसेच रमजान ईद हे पवित्र सण एकत्र आल्याने यानिमित्त शिरूर हवेली मतदार संघातील चां.ता. बोरा महाविद्यालय शिरूर,मांडवगण फराटा, उरळगाव, तळेगाव ढमढेरे, वाजेवाडी चौफुला, कोंढापुरी, शिरूर ग्रामीण रुग्णालय,  न्हावरे ग्रामीण रुग्णालय, मलठण, पाबळ, कोरेगाव मूळ, लोणी काळभोर, वाघोली, कारेगाव येथील सर्व कोविड केअर सेंटर मधील रुग्णांचा सण गोड व्हावा या दृष्टिकोनातून या दाम्पत्याचा वतीने आज सकाळी सर्व कोविड केअर सेंटर मधील रुग्णांना पुरणपोळीचे जेवण देण्यात आले.आज संध्याकाळी या सर्व प्रतिभा आरोग्य केंद्रातील रुग्णांना शीरखुर्माचीही मेजवानी मिळणार आहे
       सकाळी पुरणपोळी व संध्याकाळी शीरखुर्मा हा या रुग्णांसाठी दुग्धशर्करा योग म्हणावा लागेल.बोरा महाविद्यालयातील कोविड केअर सेंटर मध्ये शहरातील राष्ट्रवादीच्या पदाधिकाऱ्यांच्या असते पुरणपोळीचे  जेवण रुग्णांना देण्यात आले.राष्ट्रवादी लीगल सेलचे तालुकाध्यक्ष अँड.प्रदीप बारवकर, शहराध्यक्ष ॲड. रवींद्र खांडरे, शिरुर बार असोसिएशनचे माजी अध्यक्ष ॲड.संजय ढमढेरे,ॲड.राजेंद्र शितोळे,दिलीप कांबळे,राष्ट्रवादी युवकचे शहराध्यक्ष रंजन झांबरे,कार्याध्यक्ष,हाफिज बागवान, सागर पांढरकामे,सागर नरवडे,कलीम सय्यद, राहील शेख, प्रतीक काशीकर आदी यावेळी उपस्थित होते.
प्रतिभा आरोग्य केंद्रातील सर्व रुग्णांचा सण गोड व्हावा यासाठी सुजाता पवार यांनी संपूर्ण नियोजन केले. मांडवगण फराटा येथील केंद्रात त्यांनी स्वतः रात्री बारा वाजल्यापासून उपस्थित राहून पुरणपोळी जेवणाच्या तयारीकडे जातीने लक्ष दिले.

Leave A Reply

Your email address will not be published.