पाबळ ग्रामीण रुग्णालयातील चाळीस ऑक्सिजन बेड वापराविना पडून

संजय पाचंगे यांचा बेमुदत उपोषणाचा इशारा

0

शिरूरनामा न्यूज नेटवर्क

शिरूर: तालुक्यात अनेक कोविड-१९ रुग्णांना ऑक्सिजन बेड मिळण्यासाठी झगडावे लागत असून ऑक्सिजन बेड अभावी अनेकांना प्राण गमवावे लागले आहेत.असे विदारक चित्र असताना पाबळ येथील ग्रामीण रुग्णालयातील ४० ऑक्सिजनचे बेड वापराविना पडून आहेत. यास सर्वस्वी आरोग्य विभाग कारणीभूत असून १७  मे पर्यंत या ऑक्सिजन बेडचे युनिट सुरू न केल्यास बेमुदत उपोषणचा इशारा पुणे जिल्हा भाजपा उद्योग आघाडीचे अध्यक्ष संजय पाचंगे यांनी दिला आहे.

            पाचंगे यांनी आज पाबळ येथील ग्रामीण रुग्णालयाला भेट दिली.या रुग्णालयात एकूण शंभर बेड असून साठ बेड हे विलगीकरण कक्षासाठी वापरण्यात आले आहेत.उर्वरित ४० बेड हे ऑक्सिजन बेड असून ते वापराविना पडून असल्याचे पाचंगे यांच्या निदर्शनास आले.मागील वर्षी (२०२०) कोरोनाची साथ देशात सर्वत्रच बळावली.कोरोनाच्या संकटकालीन परिस्थितीत ऑक्सिजन तसेच व्हेंटिलेटर बेडचे महत्व सर्वांनाच समजले.गेल्या पाच महिन्यातील तालुक्यातील 

कोरोना रुग्णांची परिस्थिती पाहता जिल्ह्यातील इतर तालुक्याच्या तुलनेत तालुक्‍यात सर्वाधिक रुग्णसंख्या आहे.एकीकडे तालुक्यात कोविड रुग्णांना ऑक्सिजन बेड मिळणे दुरापास्त झाले असल्याचे व अनेक रुग्णांना ऑक्सिजन बेड अभावी प्राण गमवावे लागल्याचे चित्र असताना या रुग्णालयातील सुसज्ज अवस्थेतील ऑक्सिजन बेड मात्र १४ महिन्यांपासून वापराविना पडून आहेत.
          पाबळ येथील रुग्णालयातील बेड वापराविना का पडून आहेत? याबाबत पाचंगे यांनी तहसिलदार लैला शेख यांना विचारले असता, त्यांनी आरोग्य विभागाला याबाबत कळविले होते,मात्र तरीही ते कार्यान्वित करण्यात आले नसल्याचे सांगितले. याबाबत पाचंगे यांनी तालुका आरोग्य अधिकारी यांचेशी संपर्क साधला. त्यांनी स्टाफ नसल्यामुळे ऑक्सिजन बेड कार्यान्वित नसल्याचे सांगितले.हा एकंदरीत गंभीर प्रकार असून आरोग्य विभागाचा निष्काळजीपणा असल्याचा आरोप पाचंगे यांनी केला आहे.ऑक्सिजन बेेडविना प्राण गमवावे लागलेल्या रुग्णांच्या मृत्यूस हा विभाग कारणीभूत असल्याचे म्हटले आहे.१७ मेपर्यंत हे बेड कार्यान्वित करा अन्यथा बेमुदत उपोषण करण्याचाा इशारा पाचंगे यांनी दिला आहे.
Leave A Reply

Your email address will not be published.