शिवसेनेच्या वतीने आयोजित शिवजयंती सोहळा उत्साहात साजरा

विविध क्षेत्रातील मान्यवरांनी केले शिवरायांना अभिवादन

0
शिरूरनामा न्यूज नेटवर्क
शिरूर:शिवसेनेच्या वतीने आयोजित करण्यात आलेल्या शिवजयंती सोहळ्यात विविध क्षेत्रातील मान्यवरांनी शिवरायांना अभिवादन केले. शिरूर शहर शिवसेनेच्या वतीने नगरपरिषद स्वच्छता कर्मचाऱ्यांना यावेळी सॅनिटायझरचे वाटप करण्यात आले.
         येथील शिवसेवा मंडळाजवळ .कै चंद्रकांत पोटावळे व्यासपीठावर शहरातील मान्यवरांनी शिवरायांच्या पुतळ्यास पुष्पहार अर्पण करून अभिवादन केले. नगराध्यक्षा वैशाली वाखारे,मराठा सेवा संघाचे अध्यक्ष नामदेवराव घावटे,शिवसेनेचे पुणे जिल्हा संघटक संजय देशमुख,नगरपरिषद बांधकाम समितीचे सभापती अभिजीत पाचर्णे,स्वच्छता व आरोग्य समितीचे सभापती विठ्ठल पवार,माजी स्वच्छता सभापती विनोद भालेराव महिला व बालकल्याण समितीच्या उपसभापती अंजली थोरात,नगरसेविका रोहिणी बनकर,मनीषा कालेवार,संगीता मल्लाव,जनता दलाचे जिल्हाध्यक्ष संजय बारवकर शिवसेनेचे शहरप्रमुख मयूर थोरात,शिरूर शिक्षण मंडळाचे माजी सदस्य जयवंत साळुंखे,रिक्षा पंचायतीचे अध्यक्ष अनिल बांडे,संदीप जामदार,नितीन जामदार,संतोष पवार,निखिल केदारी,आकाश खांडरे,पप्पू गव्हाणे, सुनील चौधरी,संदीप चव्हाण,लाला लोखंडे,राजेंद्र चोपडा,भरत जोशी,हितेश शहा,विराज जाधव,पांडुरंग कुरंदळे,मुकेश पाचर्णे,संजय उकरंडे आदी यावेळी उपस्थित होते.
         साडेतीनशे वर्षे उलटूनही जनतेच्या मनावर अधिराज्य करणाऱ्या शिवरायांचे शिवभक्त म्हणून आपण तेव्हाच शोभू जेव्हा देशाच्या भल्याचे काम करू.असे प्रतिपादन नगराध्यक्षा वाखारे यांनी केले. प्रत्येक दिवस शिवरायांच्या विचारांनी प्रेरित होईल,तेव्हाच खऱ्या अर्थाने शिवजयंती साजरी होईल असे विचार शिवसेनेचे पुणे जिल्हा संघटक देशमुख यांनी मांडले.

Leave A Reply

Your email address will not be published.