शिरुर शहरात ‘एस आर ए’ अंतर्गत झोपडपट्टी परिसर विकासाचा प्रयत्न- आमदार अशोक पवार
शहरात तालुका क्रीडांगण तसेच नदी सुधार योजना राबविण्याचा मानस
शिरूर:शिरुर नगर परिषद हद्दीत झोपडपट्टी पुनर्वसन प्राधिकरणाच्या अंतर्गत (एस आर ए) झोपडपट्टी परिसराचा विकास करण्याचा आपला मनोदय असून शासनाने यास परवानगी द्यावी यासाठी अधिवेशनामध्ये हा मुद्दा उचलून धरणार असल्याचे आमदार अशोक पवार यांनी ‘शिरूरनामा’शी बोलताना सांगितले.शहरात नगरपरिषदेच्या सहकार्याने तालुका क्रीडांगण व्हावे तसेच नदी सुधार प्रकल्पांतर्गत शहरातून जाणाऱ्या घोडनदीचा काठ सुशोभित करण्याचा आपला प्रयत्न असल्याचेही आमदार पवार यांनी सांगितले.