महिलांनी सक्षम होण्यासाठी शिक्षणाची कास धरावी- आमदार अशोक पवार
मॅरेथॉन, सूर्यनमस्कार स्पर्धेला महिलांचा मोठा प्रतिसाद
शिरूर नामा न्यूज नेटवर्क
शिरूर:महिलांनी सबल,सक्षम होण्यासाठी शिक्षणाची कास धरणे आवश्यक आहे असे मत शिरूर-हवेलीचे आमदार अशोक पवार यांनी येथे व्यक्त केले. स्वतःमधील कलागुण व कौशल्य ओळखून त्याचा स्वतःच्या विकासासाठी फायदा केला पाहिजे असेही पवार म्हणाले.
जिल्हा परिषद कृषी व पशुसंवर्धन समितीच्या सभापती सुजाता पवार यांच्या वतीने येथे महिलांसाठी मॅरेथॉन, सूर्यनमस्कार व हळदी कुंकुवाच्या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी आमदार पवार व सुजाता पवार यांची डॉ.स्मिता बोरा यांनी मुलाखत घेतली. यावेळी विचारण्यात आलेल्या महिलाविषयक प्रश्नाला उत्तर देताना आमदार पवार यांनी उपरोक्त मत व्यक्त केले. यावेळी डॉ.बोरा यांनी विचारलेल्या प्रश्नांना पवार दाम्पत्याने दिलखुलासपणे उत्तरे दिली. कार्यक्षमता टिकवण्यासाठी कुठून प्रेरणा मिळते या प्रश्नावर आमदार पवार म्हणाले, माझे वडील माजी आमदार रावसाहेब दादा पवार त्यांनी आपल्या राजकीय जीवनात समाजकारणाचा एक आगळा वेगळा आदर्श निर्माण केला.हाच आदर्श ठेवून मी माझा राजकीय प्रवास करीत असून यातून मिळणारे जनतेचे प्रेम व प्रतिसाद हीच माझी खरी प्रेरणा आहे.आपल्या राजकीय,सामाजिक जीवनात पत्नी सुजाता यांची मोलाची व खंबीर साथ असल्याचे यावेळी आमदार पवार यांनी आवर्जून सांगितले. माझे सासरे माजी आमदार रावसाहेब दादा पवार व माझे पती आमदार पवार हे माझे आदर्श असून त्यांच्या समाजकारणाच्या पावलावर पाऊल ठेवून मी राजकारणात सक्रिय आहे.असे यावेळी सुजाता पवार यांनी सांगितले. पंचायत समितीच्या सभापती मोनिका हरगुडे,शिरूर शहर विकास आघाडीचे अध्यक्ष सुभाष पवार,नगराध्यक्षा वैशाली वाखारे,राष्ट्रवादीचे शहराध्यक्ष मुजफ्फर कुरेशी, खरेदी-विक्री संघाचे सभापती राजेंद्र नरवडे,संचालक सुरेश पाचर्णे,राष्ट्रवादी वकील सेलचे शिरीष लोळगे, शहराध्यक्ष रवींद्र खांडरे,युवक शहराध्यक्ष रंजन झांबरे,महिला तालुकाध्यक्ष संगीता शेवाळे, युवती शहराध्यक्ष तज्ञिका कर्डिले,युवकचे माजी शहराध्यक्ष निलेश पवार हाफिज बागवान, राहील शेख यावेळी उपस्थित होते.
येथील सुंदर सृष्टी येथे आयोजित केलेल्या हळदीकुंकवाच्या कार्यक्रमास महिलांनी मोठी गर्दी केली. यावेळी महिलांसाठी विविध गेम्स,उखाणे स्पर्धा घेण्यात आली. त्याचा महिलांनी मनमुराद आनंद लुटला.यात मिळालेली विविध बक्षिसे महिलांचा आनंद द्विगुणित करून गेली.दरम्यान पहाटे मॅरेथॉन व सूर्यनमस्कार स्पर्धा घेण्यात आली.वैविध्या लेडीज डॉक्टर्स असोसिएशन, शिरूर यांनी सूर्यनमस्कार स्पर्धेचे तरआदिशक्ती महिला मंडळ, रामलिंग महिला उन्नती संस्था, युवा स्पंदन,ग्रीन थॉट्स,ॲक्टिव ग्रुप,वैभवी महिला पतसंस्था,साधना सखी पतसंस्था,महासंघ आदींनी मॅरेथॉनचे नियोजन केले. डॉ. स्मिता बोरा यांनी सूत्रसंचालन केले व आभार मानले. सूर्यनमस्कार स्पर्धेत एकूण साठ महिला स्पर्धकांनी सहभाग घेतला. निकाल खालीलप्रमाणे
१५ – २५वयोगट -ऋतुजा मदगे-२५५,
आरती मापारी -२५०
२६ – ४५ वयोगट-सना शेख -३५०
जानकी बदडे -३२५
४६ पुढील- वेताळ- १७०
बेबीनंदा सकट -१६०
मॅरेथॉन स्पर्धेचा निकाल खालीलप्रमाणे
१० ते १७ वयोगट
१)मयुरी गव्हाणे २)श्रुती शेटे३) सिद्धी मल्लाव ४)समृद्धी कोकाटे
वयोगट१७ते२५-
१)विद्या साठे २)काजल टेंभेकर३) ४)विद्या धावडे ५)तृप्ती काळे
वयोगट २५ते४०-
१)स्वाती साठे मयुरी २)अठारे रुपाली ३)दुनघव ४)पल्लवी जगताप
वयोगट ४० पुढील-
१)सुनिता कारखेले २)जुई पऱ्हाड ३)रूपाली भोगावडे ४)अश्विनी जांगडे
वयोगट ६० पुढील-
१)शकुंतला शांता २)भापकर घावटे