वाघोलीचा संघ ‘पीआरडी’ चषकाचा मानकरी

दर्जेदार आयोजनामुळे आयोजकांचे सर्वांनी केले कौतुक

0

शिरूरनामा न्यूज नेटवर्क

शिरूरदे:देखण्याव दर्जेदार नियोजनमुळे जिल्ह्यात नावलौकिक मिळवलेल्या मा .नगराध्यक्ष प्रकाशशेठ रसिकलाल धारीवाल चषक (पी आर डी) टेनिस बॉल क्रिकेट स्पर्धेत वाघोली संघाने शिरूर संघाचा पराभव करून पी आर डी चषकावर आपले नाव कोरले.माजी नगराध्यक्ष रवींद्र ढोबळे ब त्यांच्या सहकाऱ्यांनी या स्पर्धेचे आयोजन केले.

       स्व.उद्योगपती रसिकलाल माणिकचंद धारिवाल व  स्व. केशरसिंग खुशालसिंग परदेशी या दोन मित्रांच्या स्मरणार्थ  माजी नगराध्यक्ष रविंद्र ढोबळे, शिक्षण मंडळ सदस्य प्रशांत शिंदे यांच्या वतीने पी आर डी चषक स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते.स्पर्धेचे यंदाचे आठवे वर्ष होते.सुसज्ज मैदान, प्रेक्षक गॅलरी, समालोचन, लाइव्ह प्रक्षेपण अशा माजी नगराध्यक्ष ढोबळे यांनी केलेल्या देखण्या नियोजनमुळे अवघे शिरूर व परिसर  क्रिकेटमय झाल्याचे दिसून आले.आठ दिवस चाललेल्या या स्पर्धेचा हजारो प्रेक्षकांनी मनमुराद आनंद घेतला. रंगनाथ शिंदे साई राम इलेव्हन शिरूर विरुद्ध यशवंत पाचंगे फायटर्स वाघोली असा अंतिम सामना रंगला.अतिशय चुरशीच्या झालेल्या या सामन्यात वाघोली संघाने बाजी मारली.युवा नेते उद्योगपती आदित्य धारिवाल, ऋषीराज पवार, शैलेश मोहिते, मराठी अभिनेत्री स्मिता गोंदकर हस्ते विजेत्यांनााााा बक्षीस वितरण करण्यात आले. पारनेर चे आमदार निलेश लंके, घोडगंगा चे संचालक राजेंद्र गावडे , माजी उपनगराध्यक्ष जाकीरखान पठाण ,भाजप उद्योग आघाडीचे जिल्हाध्यक्ष संजय पाचंगे, शिवसेवा मंडळाचे विश्वस्त श्रीनिवास परदेशी,मराठा सेवा संघाचे नामदेव घावटे , नगरसेवक अभिजीत पाचर्णे, संजय देशमुख ,स्पर्धेचे आयोजक रविंद्र ढोबळे ,स्पर्धेचे संयोजक प्रशांत शिंदे ,नगरसेवक जाकीर ख़ान पठाण, ,शहर युवक अध्यक्ष रंजन झांबरे प्राध्यापक दादासाहेब गवारी, माजी नगरसेवक दादाभाऊ वाखारे ,प्रविण दसगुडे,तुकाराम खोले,आंबेगाव विधानसभा काँग्रेसचे अध्यक्ष यशवंत पाचंगे ,जयवंत साळूके,जयसिंग धोत्रे, शिरिष  लोळगे, रवींद्र खांडरेे आदी यावेळी उपस्थित होते. आमदार अशोक पवार, आदित्य धारिवाल ऋषिकेश पवार व अंतिम सामन्याचेेे आकर्षण ठरलेली  सिनेेअभिनेत्री स्मिता गोंदकर  यांनी दर्जेदार क्रिकेट स्पर्धेचे आयोजन केल्याबद्द्ल माजी नगराध्यक्षष ढोबळे व त्यांच्या सहकाऱ्यांचेेेे भरभरून कौतुक केले.                   फिरोज भाई बागवान ,दत्ता पवार, ,गुलाम पठाण ,रविंद्र जाधव , सागर ढवळे ,राहुल पवार यांनी स्पर्धेचे समालोचन केले. सनी दळवी , दगडू त्रिमुखे, राजू सुतार अमोल पवार बाळासाहेब साळवे, पोपट चव्हाण,राजेंद्र ढोबळे विजय ढोबळे अजय ढोबळे तुषार माने ऋतिक ढोबळे तेजस माने रवींद्र गुळादे, राजेंद्र माने ,तुषार माने, चेतन माने ,संतोष माने,लखन कोळपकर , अखिल शेख अनिकेत ढोबळे, विशाल गावडे ,सोनू मदने, ओम ढवळे आरती दसगुडे, पायल पवार ,कल्यानी यांनी नियोजनात सहभाग घेतला.स्पर्धेसाठी पुण्यातील नामांकित पी डी सी पंच , स्पर्धेेत डान्सिंग हंपायर गोट्या पी आर डी क्रिकेट स्पर्धेचे आकर्षण ठरला.
          प्रथम क्रमांक -यशवंत पाचंगे वाघोली , द्वितीय क्रमांक – रंगनाथ शिंदे साईराम इलेव्हन, तृतीय -फिरोजभाई बागवान शिवसागर लिजन्ट जुन्नर , चतुर्थ-फिरोजभाई शेख तिरंगा हॉटेल न्यू स्टार एलेव्हन.
उत्कृष्ट फलंदाज -राहूल सातव,उत्कृष्ट गोलंदाज -रामा झेंडे,उत्कृष्ट यष्टीरक्षक -शिवा देविकर,उत्कृष्ट झेल -डॉ आकाश सोमवंशी,विकेट हॅट्रीक -अमोल पवार,षटकार हॅट्रीक -निखिल,चौकार हॅट्रीक – भूषण गोळे,मॅन ऑफ द सिरीज – इजाज कुरेशी
रवींद्र ढोबळे यांनी स्वागत व प्रास्ताविक केले, प्रा.घावटे यांनी सूत्रसंचालन केले,तर जयवंत साळुंखे यांनी आभार मानले.*

Leave A Reply

Your email address will not be published.