वीज तोडू नका, अन्यथा पुन्हा वीज जोडू-आम आदमी पार्टी  

मुख्यमंत्र्यांच्या निवासासमोर आंदोलनाचा इशारा

0
शिरूरनामा न्यूज नेटवर्क
शिरूर:लॉकडाउन मुळे आर्थिक दृष्ट्या पिचलेल्या जनतेची वीज तोडू नका, अन्यथा पुन्हा वीज जोडण्याचा तसेच वीज तोडण्याची कृती सुरू ठेवल्यास मुख्यमंत्र्यांच्या निवासासमोर आंदोलन करण्याचा इशारा आम आदमी पार्टीच्या वतीने देण्यात आला आहे.
            मोठ्या प्रमाणावरील थकबाकीमुळे महावितरणने ग्राहकांचे वीज कनेक्शन तोडण्याचे आदेश दिले आहेत. यास आम आदमी पार्टीने विरोध दर्शवला आहे.गेल्या वर्षभरात लॉकडाउन मुळे जनतेचा रोजगार हिरावला गेला. त्यांना आर्थिक समस्येचा सामना करावा लागला.मुख्यत्वे घरगुती आणि लघु उद्योजक ग्राहकांना या लॉक डाउनचा मोठ फटका बसला. परिणामी या घटकांची वीज बिलांची थकबाकी आहे.अजूनही हे घटक आर्थिक दृष्ट्या सावरलेले नाहीत. अशात त्यांची वीज कापणे म्हणजे सावकारीच आहे. असा टोला आम आदमी पार्टीचे राज्य संयोजक रंगा राचुरे यांनी लगावला आहे. राचुरे यांच्या म्हणण्यानुसार मुख्यमंत्र्यांनी अभ्यास करूनच तीस टक्के वीज सवलतीचे आश्वासन वचनाम्यात दिले होते. हे आश्वासन न पाळण्या मागे कोणाचा दबाव आहे. हे मुख्यमंत्र्यांनी जनतेला सांगावे.
          वास्तविक सार्वजनिक दिवाबत्ती-पाणीपुरवठा व इतर शासकीय सेवांची वीजबिल थकबाकी मोठी आहे तसेच उच्चदाब व बेकायदेशीर वीज वापराचा वीजगळतीचा बोजा देखील मोठा आहे.ही रक्कम वसूल न करता सामान्य ग्राहकांच्या अंगावर तो बोजा टाकणे व थकबाकीपोटी त्यांचे वीज कनेक्शन तोडणे हे अयोग्य आहे. असे राचुरे यांनी म्हटले आहे. सरकारने
मद्यविक्री परवाना शुल्कात ३६० कोटींची सवलत दिली आहे, दुसरीकडे केंद्र सरकारने लॉकडाउन काळातील टोल वसुली झाली नाही म्हणून टोल कंत्राटदारांना भरपाई दिली आहे.सरकारची ही धोरणे उफराटी व सामान्य जनतेची फसवणूक करणारी आहेत. त्यामुळे आर्थिक दृष्ट्या संकटात सापडलेल्या जनतेची वीज तोडल्यास आप चे कार्यकर्ते पुन्हा वीज जोडणी करतील.
याउपरही वीज खंडित करण्याची जनविरोधी कृती चालू ठेवल्यास मुख्यमंत्र्यांच्या निवासाबाहेर ठिय्या आंदोलन करू असा इशारा राचुरे यांनी दिला आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.