शिरूरनामा न्यूजनेटवर्क
शिरूर:रक्तदान सर्वात श्रेष्ठ दान समजलं जातं.याच भान कमी होत आहे की काय,असे रक्ताच्या तुटवड्यावरुन जाणवू लागलं आहे.अशा परिस्थितीतही गेली २२ वर्ष न चुकता रक्तदान करणाऱ्या येथिल रक्तदात्यामुळे पुणे येथिल एका चिमूकलीला जीवदान मिळालं. रक्तदानाचं अस व्रत घेतलेली तरुण मंडळी पुढे आल्यास राज्यात रक्ताचा तुटवडा जाणवणार नाही आणि या चिमुकली सारखे अनेकांना जीवदानही मिळू शकेल.
येथील नगरपरिषद शिक्षण मंडळाचे माजी सभापती निलेश खाबिया यांनी रक्तदान केल्यामुळे पुणे येथील एका चिमुकलीला जीवदान मिळाले.गेली २२ वर्ष सातत्याने रक्तदान करत असल्याने रक्तदान चळवळीचे प्रणेते, नेते व कार्यकर्त्यांना खाबिया चांगलेच परिचित आहेत. यातूनच पुणे येथे दिनानाथ मंगेशकर रुग्णालयात दाखल असलेल्या एका चिमुकलीला यकृत प्रत्योरोपण शस्त्रक्रियेसाठी रक्ताची गरज असल्याची माहिती मिळताच रक्ताचे नाते ट्रस्टचे प्रमुख राम बांगड यांनी खाबिया यांना संपर्क साधून रक्तदान करण्याचे आवाहन केले. खाबिया यांनी क्षणाचाही विलंब न लावता प्रतिसाद दिला.खाबिया यांनी पुणे येथे रुग्णालयात जाऊन त्यांनी रक्तदान केले.या मुलीला वीस बाटल्या रक्ताची गरज होती.यामध्ये खाबिया यांनी एक बाटली रक्त देऊन आपले माणूसकीचे कर्तव्य बजावले.वेळेत रक्त मिळाल्याने चिमुकलीला जीवदान मिळाले.
गेल्या बावीस वर्षात निलेशने ५६ वेळा रक्तदान केले आहे. रक्तदानाचा वसा घेतलेल्या खाबिया कुटुंबातील निलेश चे मोठे बंधू लक्ष्मीकात खाबिया यांनीही आतापर्यंत ८३ वेळा रक्तदान केलेले आहे. निलेश ची पत्नी वैशाली व मुलगा मित यांनाही रक्तदानाची गोडी लागली असून त्यांनीही रक्तदान करण्यास सुरुवात केली आहे. खाबिया कुटुंबाचा रक्तदानाचा हा आदर्श सर्वांनी घेतल्यास रक्तदानाचा तुटवडा भासणार नाही.असे वाटते.