कमलाबाई धारिवाल यांच्या स्मृतिदिनानिमित्त ब्लँकेट वाटप

0
शिरूरनामा न्यूजनेटवर्क

शिरूर:कमलाबाई रसिकलाल धारीवाल यांच्या स्मृतिदिनानिमित्त नगरपरिषद स्वच्छता महिला कर्मचारी तसेच गोकुळ वृद्धाश्रम येथील ज्येष्ठ नागरिकांना ब्लँकेटचे वाटप करण्यात आले.

          सामाजिक शैक्षणिक तसेच अध्यात्मिक क्षेत्रात धारीवाल कुटुंबाचे दातृत्व देशभर परिचित आहे.अशा दातृत्व संपन्न कुटुंबातील कमलाबाई यांच्या स्मृतिदिनानिमित्त उपेक्षित घटकांना मदत व्हावी या हेतूने स्वच्छता व आरोग्य समितीचे सभापती विठ्ठल पवार व  नगरसेवक अभिजीत पाचरणे यांच्यावतीने नगरपरिषद  स्वच्छता विभागाच्या महिला कर्मचाऱ्यांना ब्लँकेटचे वाटप करण्यात आले.याबरोबरच गोकुळ वृद्धाश्रम येथे वास्तव्यास असणाऱ्या ज्येष्ठ नागरिकांनाही ब्लँकेट वाटपासह अन्नदान करण्यात आले. शिरूर शहर विकास आघाडीचे अध्यक्ष सुभाष पवार,स्वच्छता आरोग्य सभापती विठ्ठल पवार, महिला बालकल्याण सभापती मनीषा कालेवार,नगरसेवक अभिजीत पाचरणे,विनोद भालेराव,संगीता मल्लाव, पूजा जाधव, रेश्मा लोखंडे,आरोग्य निरीक्षक दत्तात्रय बर्गे, आरपीआयचे शहराध्यक्ष निलेश जाधव,वसीम सय्यद आधी यावेळी उपस्थित होते.
           कमलाबाई धारिवाल या नम्रता व माणुसकीचे मूर्तिमंत उदाहरण होते.असे गौरवोद्गार सुभाष पवार यांनी यावेळी काढले.

Leave A Reply

Your email address will not be published.