पवार व धारीवाल यांच्यामुळे शिरूर शहराचा चेहरामोहरा बदलतो आहे- कुरेशी  

0

शिरूरनामा न्यूज नेटवर्क

शिरूर: आमदार अशोक पवार व नगरपरिषद सभागृह नेते प्रकाश धारीवाल यांच्या विकासशील दृृष्टिकोनामुळे शिरुर शहराचा चेहरामोहरा बदलतो आहे.असे मत पाणी पुरवठा,विद्युत समितीचे सभापती मुजफ्फर कुरेशी यांनी व्यक्त केले.

शहरात एसटी बसस्थानक ते पाषाणमळा या टप्प्यात नगरपरिषदेच्या वतीने दुभाजकावर ९१ विद्युत पोल उभारण्यात आले आहेत. पाच ठिकाणी हायमॅक्स उभारले जाणार आहेत. पोल उभारल्यानंतर प्रकाशव्यवस्था कशी दिसते याची पाहणी आमदार पवार व सभागृह नेते धारीवाल यांनी केली. दुभाजकावर उभारण्यात आलेले आकर्षक असे विद्युत पोल व यातून शहरातून जाणाऱ्या पुणे नगर रस्त्यावर निर्माण झालेला प्रकाशव्यवस्थेचा लखलखाट यामुळे शहराच्या सौंदर्यात भर पडली आहे. मार्च २०२० पूर्वी शहरातून जाणारा पुणे नगर रस्ता जागतिक बँक प्रकल्पाच्या ताब्यात होता. २०१८ सालापासून नगर परिषद विद्युत पोल उभारण्यासाठी प्रयत्नशील होती.मात्र रस्ता नगरपरिषदेच्या ताब्यात नसल्याने प्रश्न मार्गी लागत नव्हता. दरम्यान मार्च २०२० मध्ये जागतिक बँकेने रस्ता नगर परिषदेकडे हस्तांतरीत केला. रस्ता ताब्यात येताच सभागृह नेते धारीवाल यांच्या मार्गदर्शनाखाली नगराध्यक्षा वैशाली वाखारे, पाणी पुरवठा व विद्युत समिती सभापती कुरेशी, मुख्याधिकारी महेश रोकडे यांनी आमदार पवार यांच्याकडे विद्युत पोलच्या निधीसाठी पाठपुरावा केला.आमदार पवार यांनी तत्परता दाखवल्याने जिल्हा नियोजनतंर्गत नागरी दलितअेतर योजनेतून ४१ लाख रुपयांचा निधी उपलब्ध झाला.

निधी उपलब्ध होताच शहरातून जाणाऱ्या पुणे नगर रस्त्यावरील दुभाजकांवर एसटी बसस्थानक ते पाषाणमळा ९१ विद्युत पोल उभारण्यात आले.आमदार पवार यांनी त्वरीत निधी उपलब्ध करून दिल्याने हे काम मार्गी लागल्याचे कुरेशी यांनी सांगितले.पुढील टप्प्यात एसटी बसस्थानक ते सतरा कमानी पूल या टप्प्यात विद्युत पोल उभारण्यात येणार असल्याचेही कुरेशी यांनी सांगितले.आमदार पवार व सभागृह नेते धारीवाल यांचा विकासशील दृष्टिकोन शहराच्या विकासात भरघालत असून यामुळे शहराच्या सौंदर्यात भर पडत आहे.असे प्रशंसोद्गार कुरेशी यांनी काढले.नगराध्यक्षा वैशाली वाखारे, मुख्याधिकारी महेश रोकडे,संपदा पतसंस्थेचे चेअरमन प्रभाकर डेरे,माजी उपनगराध्यक्ष जाकिरखान पठाण, स्वच्छता व आरोग्य सभापती विठ्ठल पवार, महिला बालकल्याण समितीच्या सभापती मनिषा कालेवार,नगरसेवक अभिजित पाचर्णे, सुनिता कुरुंदळे,विजय दुगड, संजय देशमुख,माजी नगरसेवक दादाभाऊ वाखारे, आरोग्य निरीक्षक दत्तात्रय बर्गे, विद्युत विभागाचे अभियंता सुरेश तारडे, तुकाराम खोले,समता परिषदेचे किरण बनकर,आरपीआयचे शहराध्यक्ष निलेश जाधव, सागर पांढरकामे, हाफिज बागवान, राहिल शेख, मनसेचे सुशांत कुटे आदि यावेळी उपस्थित होते.

 

Leave A Reply

Your email address will not be published.