शिरूर :आपला जीव धोक्यात घालून कोविड रुग्णांची सेवा करणाऱ्या वेदांता हॉस्पिटलमधील नर्सेसनी आज या रुग्णांना राखी बांधून मानवताप्रधान सेवेला सलाम करणारे रक्षाबंधन साजरे केले. या रुग्णांच्या जीवनातीत हे सर्वोत्तम रक्षाबंधन असेल असे म्हटलेतर वावगे ठरणार नाही.
शासनाने येथील वेदांता हॉास्पिटल कोविड आरोग्य सेंटरसाठी अधिग्रहित केले आहे. या रुग्णालयात सध्या पंधरा कोविडचे रुग्ण दाखल आहेत. कोविड रुग्णाच्या नातेवाईकास त्याला भेटणे तर दूरच जवळपासही जाऊ दिले जात नाही.अशा अवस्थेत आपला जीव धोक्यात घालून डॉक्टर्स नर्सेस, इतर पॅरामेडिकल स्टाफ हे या रुग्णाची सेवा करीत आहे. ही मानवतेची सेवा कमी म्हणून की काय या रुग्णालयातील नर्सेसनी या कोविड रुग्णांचे मनोबल वाढवण्यासाठी रुग्णालयातच एक मानवता सेवेला सलाम करणारे आगळेवेगळे रक्षाबंधन साजरे केले. हातात निरांजन, राखी व मिठाईने सजलेले ताट घेऊन ओवाळण्यासाठी आलेली भागिनी पाहून कोविड रूग्णांचे ही डोळे पाणावले. नर्स व रुग्णाचे नाते तसे शब्दांपालिकडले.मात्र कोविडच्या वातावरणात रूग्णालयात निर्माण झालेले बंधुभागिनीचे नाते हे रक्ताच्या नात्या पलिकडचे आहे. हे निश्चित.या रुग्णालयाचे डॉ. आकाश सोमवंशी डॉ हेमंत पालवे डॉ. धनंजय पोटे डॉ. सोनाली व्यवहारे डॉ. रेश्मा धालवडे डॉ. अजय कोकणे या कोरोना योद्धांच्या कल्पनेतून हे अनोखे रक्षाबंधन वेदांतामध्ये साजरे झाले.
समाजाने कोरोना पेशंट विषयी आपले मत बदलणे गरजेचे आहेत. ते गुन्हेगार नाहीत त्यांना आपलेपणाची, आधाराची गरज आहे त्यांचे मनोबल वाढवण्यासाठी आज रक्षाबंधनाचा कार्यक्रम आयोजित केल्याचे डॉक्टरांनी सांगितले.कोरोना आज उद्या जाईल मात्र या रुग्णांना मानसिक आधार देऊन आपल्यातील माणूसकी जपणे गरजेचे असल्याचे मत या योद्धानी व्यक्त केले