शिरूर: पुणे, पिंपरी चिंचवड प्रमाणे शिरूरमध्ये लॉक डाऊन केले जाणार नसल्याचे प्रांताधिकारी संतोषकुमार देशमुख यांनी ‘शिरूरनामाशी’ बोलताना सांगितले.
जिल्हा प्रशासनाच्या आदेशानुसार पुणे,पिंपरी चिंचवड महानगरपालिका,या शहरांच्या आयुक्तालयाच्या हद्दीत येणारा भाग,काही ग्रामीण भाग,हवेली तालुका आदि भागात सोमवारपासून लॉकडाऊन केले जाणार आहेे. शिरूर शहर व तालुक्यात १२९ कोरोनाचे रुग्ण आढळून आल्याने शिरूरमध्ये लॉकडाऊन केले जाणार अथवा नाही याबाब शिरूरकर साशंक होतेे.याबाबत स्पष्टता नसल्याने नागरिक विचलित झाले होतेे. दरम्यान याबाबत प्रांताधिकारी देशमुख यांच्याशी संपर्क साधला असता, शहरा व तालुक्यात लॉकडाऊन केलेेे जाणार नसल्याचे त्यांनी स्पष्ट केले. याबाबत अद्याप जिल्हाधिकाऱ्यांंनी कसलेही निर्देश दिले नसल्याचे त्यांनी सांगितले. यामुळे शिरूरमधिल व्यवहार सुरु राहणार आहेत. लॉकडाऊन केले जाणार नसलेतरी कोरोनाचा प्रादुर्भाव वाढू नये याची दक्षता नागरिकांनी घ्यावी असे आवाहन देशमुख यांनी केले आहे.
तालुक्यातील शिक्रापूर, रांजणगांव गणपती, कोरेगांव भीमा व सणसवाडी येथे आढळून आलेल्या कोरोना बाधित रुग्णांच्या वाढत्या संख्येमुळे या गांवात अंशतः बंद पाळण्याचे आदेश प्रांताधिकारी देशमुख यांनी दिले आहेत.शासकीय कार्यालये, औद्योगिक वसाहत, वैद्यकीय सेवा वगळता या चार गांवांमध्ये सकाळी सात ते दुपारी दोन या वेळेत दुकाने व इतर आस्थापना सुरू राहणार आहेत. शिक्रापूर येथे दोन दिवसांपासूनच अंशतःबंद पाळला जात आहे.
|
|
Next Post