शशीकांत दसगुडे यांचा सभापतीपदाचा राजीनामा

उपसभापती ढमढेरे यांचाही राजीनामा

0

शिरूर:कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती शशीकांत दसगुडे, उपसभापती विश्वास ढमढेरे यांनी आज आपल्या पदाचा राजीनामा दिला. इतर संचालकांना संधी मिळावी या हेतुने राजीनामा घेण्यात आल्याचे राष्ट्रवादीचे तालुकाध्यक्ष रवि काळे यांनी पत्रकार परिषदेत सांगितले. तर स्वेच्छेने राजीनामा दिल्याचे सभापती दसगुडे यांनी शिरूरनामाशी बोलताना सांगितले.

         काळे म्हणाले,२०१७ साली बाजार समितीची सार्वत्रिक निवडणूक पार पडली.यात उपमुख्यमंत्री अजित पवार व कामगारमंत्री दिलीप वळसे पाटील यांच्या नेतृत्वाखाली व आमदार अशोक पवार यांच्या मार्गदर्शनाखाली राष्ट्रवादीने निवडणूक लढवली.मतदारांनी विश्वास दाखविल्याने राष्ट्रवादीच्या पॅनेलला दोन तृतीयांश बहुमत मिळाले. यानंतर १५जूनला( २०१७ ) पार पडलेल्या सभापती, उपसभापती पदाच्या निवडणुकीत पक्षाने संधी दिलेल्या शशिकांत दसगुडे व विश्वास ढमढेरे यांची अनुक्रमे सभापती व उपसभापतीपदी बिनविरोध निवड करण्यात आली.आमदार पवार यांच्या मार्गदर्शनाखाली दसगुडे व ढमढेरे यांनी संचालकांना विश्वासात घेऊन अतिशय चांगले काम करताना तोट्यात असलेली बाजार समिती नफ्यात आणली.दरम्यान इतर संचालकांनाही संधी मिळावी या हेतुने आमदार पवार यांनी आपणांस दसगुडे व ढमढेरे यांचे राजीनामे घेण्याची सुचना केली. यानुसार आपण आज दोघांचे राजीनामे घेतल्याचे तसेच दोघांनीही मनात किंतु परंतु न ठेवता तात्काळ माझ्याकडे राजीनामे सुपुर्त केल्याचे तालुकाध्यक्ष काळे यांनी सांगितले.
           वरिष्ठांच्या नेतृत्व व मार्गदर्शनाखाली नविन सभापती व उपसभापतीची निवड केली जाणार असल्याचे काळे यांनी सांगितले. सभापती, उपसभापती राजीनामा मागीतल्याने नाराज झालेतका?असे विचारले असता, काळे म्हणाले, त्यांची निवड करताना योग्यवेळी बदल करताना राजीनामा देण्याची तयारी ठेवावी असे आमदार पवार यांनी दोघांना सुचित केले होते. राष्ट्रवादीचे शहराध्यक्ष मुजफ्फर कुरेशी, कार्याध्यक्ष रंजन झांबरे पत्रकार परिषदेस उपस्थित होते.

Leave A Reply

Your email address will not be published.