मुंबई:प्रसिद्ध अभिनेता सुशातसिंग राजपूत याने मुंबई येथे राहत्या घरी आत्महत्या केली.आत्महत्येचे कारण समजू शकले नाही.त्याच्या आत्महत्येने फिल्म इंडस्ट्रीला आणखी एक धक्का बसला आहे.
बिहार राज्यात पूर्णिया जिल्हयात जन्मलेल्या सुशांतसिंग राजपूत याचा अभिनयाचा प्रवास टीव्ही मालिकेपासून झाला.एकता कपूर यांच्या ‘पवित्र रिश्ता ‘या मालिकेमुळे त्यास खरी ओळख मिळाली. ‘काय पो छे’ या चित्रपटात त्याला प्रमुख भुमिका मिळाली.यानंतर मिळालेल्या शुद्ध देसी रोमांस या चित्रपटाच्या यशामुळे त्याचे करीअर नांवारूपास आले. त्याने पी के, डिटेक्टिव्ह व्योमकेश बक्शी,रबता, चंदा मामा दूर के, छिछोरे, केदारनाथ या चित्रपटात काम केले.भारतीय क्रिकेटचा माजी कर्णधार, नामांकीत क्रिकेटपटू महेंद्रसिंग धोनीच्या जीवनावर आधारीत ‘एम.एस. धोनी,द अनटोल्ड स्टोरी ‘ चित्रपटात सुशांतसिंग यांस धोनीची भुमिका साकारण्याची संधी मिळाली.या चित्रपटामुळे त्याच्या लोकप्रियतेत वाढ झाली होती.अशा अभिनेत्याच्या आत्महत्येने चाहत्यांमध्ये शोककळा पसरली आहे.ऋषि कपूर, इरफान खान, संगीतकार वाजिद यांच्या मृत्यूच्या सदम्यातून फिल्म इंडस्ट्री सावरते कुठे तोच सुशांत सिंगच्या मृत्यूने इंडस्ट्रीला आणखी एक धक्का बसला.
![]() |
ReplyForward
|