शिवराज्याभिषेक दिनानिमित्त आयोजीत रक्तदान शिबिरास उत्स्फूर्त प्रतिसाद
सह्याद्री प्रतिष्ठाण,महाराष्ट्र व वुई लव्ह,शिरूर यांचा पुढाकार
शिरूर: शिवराज्यभिषेक दिनाचे औचित्य साधत सह्याद्री प्रतिष्ठाण,महाराष्ट्र,वुई लव्ह शिरूर व रक्ताचे नाते, पुणे यांच्या वतीने आयोजीत रक्तदान शिबिरात १५४ रक्तदात्यांनी रक्तदान केले.प्रतिष्ठाणच्या युवकांनी पुढाकार घेऊन या शिबिराचे आयोजन केले.त्याला कमी वेळेत चांगला प्रतिसाद मिळाला.
कोरोनाच्या पार्श्वभूमीवर रक्ताची गरज भासत आहे.या अनुषंगाने राज्यभर विविध संस्था,संघटनांच्यावतीने रक्तदान शिबिराचे आयोजन केले जात आहे.सह्याद्री प्रतिष्ठाणने एक जूनपासून,म्हणजेच गेल्या सात दिवसात राज्यभरात ७५ रक्तदान शिबिरांचे आयोजन केले.शिरूरमधील आजचे पंच्याहत्तरवे रक्तदान शिबिर होते.प्रतिष्ठाणचे येथील प्रतिनीधी कुणाल काळे यांनी दोन दिवसांपूर्वी सोशल मिडीयाच्या माध्यमातून शिवराज्यभिषेक दिनानिमित्त रक्तदान शिबिराच्या आयोजनाबाबत रक्तदात्यांना आवाहन केले होते.याला उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाल्याचे आज दिसून आले.रक्तदान करण्यातही युवकांचा मोठा सहभाग दिसून आला.अनेक महिलांनीही रक्तदान करून आपला सहभाग नोंदवला.प्रतिष्ठाणच्या वतीने पुढील आठवडाभरात राज्यात आणखी पंचवीस रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात येणार असून रक्तदान शिबिराचे शतक पुर्ण केले जाणार असल्याचे कुणाल याने सांगितले.
शिवरायांच्या प्रतिमेचे पुजन करून रक्तदान शिबिरास सुरुवात करण्यात आली.रक्ताचे नाते ट्रस्टचे अध्यक्ष राम बांगड, नगरसेवक विनोद भालेराव, मंगेश खांडरे, शिक्षण मंडळाचे माजी सभापती संतोष शितोळे,वकील संघटनेचे माजी अध्यक्ष अॅड. रविंद्र खांडरे,आदिशक्ती महिला मंडळाच्या संस्थापिका शशीकला काळे,रामलिंग महिला संस्थेच्या अध्यक्षा राणी कर्डिले, राष्ट्रवादीचे शहर कार्याध्यक्ष रंजन झांबरे, मनसेचे माजी शहराध्यक्ष सुशांत कुटे आदि यावेळी उपस्थित होते.सह्याद्री प्रतिष्ठानचे शिरूर प्रतिनिधी कुणाल काळे,योगेश जामदार,सुमित साबळे,उमेश शेळके,सागर परभणे, अक्षय ढमढेरे, तुषार थोरात, गणेश जगताप, योगेश फलके,रोहित सोनवणे या युवकांनी शिबिराच्या आयोजनासाठी विशेष परिश्रम घेतले.आदिशक्ती,रामलिंग महिला मंडळ तसेच वैभवी महासंघाचे सहकार्य लाभले.
शिक्षण मंडळाचे माजी सभापती निलेश खाबिया यांनी आज ५४ व्या वेळी रक्तदान करून रक्तदान करण्याचा आदर्श तरुणांसमोर ठेवला.