शिरूर पत्रकार संघाचे कार्य उल्लेखनीय – माजी आमदार गावडे
कोरोनामुळे अडचणीत आलेल्या गरजूंना केलेल्या मदतीबद्द्ल कौतुक
टाकळीहाजी:लॉक डाऊनच्या कालावधीत अडचणीत सापडलेल्या शेकेडो कुटुंबांना शिरूर तालुका मराठी पत्रकार संघाने केलेली मदत लाख मोलाची तसेच प्रेरणादायी असल्याचे गौरवद्गार माजी आमदार पोपटराव गावडे यांनी काढले.
तालुक्यातील काठापुर गावचे माजी सरपंच भाऊसाहेब औटी यांचे चुलते शंकर औटी ( वय ८५ )यांचे वृद्धापकाळाने निधन झाले.अतिशय कष्टातून त्यांनी शेती करून प्रगतशिल शेतकरी होण्याचा मान मिळवला.सामाजिक कार्यातही त्यांचे मोठे योगदान होते.त्यांच्या कुटुंबीयांनी त्यांच्या दशक्रिया विधीचा खर्च टाळुन शिरूर तालुका मराठी पत्रकार संघाचे अध्यक्ष संजय बारहाते व त्यांचे सहकारी करीत असलेल्या ‘एक हात मदतीचा ‘या उपक्रमास पंचवीस हजार रूपयांचा धनादेश दिला.माजी आमदार पोपटराव गावडे यांच्या हस्ते पत्रकार संघाचे अध्यक्ष बारहाते यांच्याकडे हा धनादेश सुपुर्त करण्यात आला.यावेळी गावडे यांनी औटी कुटुंबाचे कौतुक करताना लग्न तसेच इतर समारंभ, विधीचा खर्च टाळून कोरोना मुळे अडचणीत सापडलेल्या घटकांना मदतीचा हात द्या.असे आवाहन केले.पत्रकार संघ समाजातील विविध जातीधर्मातील गरीब घटकांना करीत असलेल्या मदतीचेही गावडे यांनी कौतुक केले.मात्र गेली दोन महिने न चूकता बारहाते यांनी वाडी वस्ती,पालावर जाऊन ज्या पध्दतीने गरजूंना जीवनावश्यक वस्तूंचे वाटप केले.त्याबद्द्ल गावडे यांच्यासह उपस्थितांनी बारहाते यांचे विशेष कौतुक केले. समाजाप्रती आपलेही दायित्व आहे या भावनेतून पत्रकार संघाने कोरोनामुळे अडचणीत सापडलेल्या गरजूंना मदतीचा हात दिला.अशी भावना बारहाते यांनी व्यक्त केली.बारहाते यांनी प्रांताधिकारी संजय देशमुख व तहसिलदार लैला शेख यांच्या प्रती कृतज्ञता व्यक्त केली तहसिलदार शेख यांनीही हजारो कुटुंबांपर्यंत मदत पोहोचवली,तालुका आरोग्यदायी रहावा यासाठी प्रयत्न केल्याचे यावेळी नमूद केले.औटी कुटुंबीयांनी दिलेल्या रकमेतून गरजूंनाा जीवनावश्यक वस्तूचेेेे वाटप केले जाणार असल्याचे बारहाते यांनी सांगितले.
माजी पंचायत समिती सदस्य वासुदेव जोरी(आण्णा),आदर्श काठापुर गावचे माजी सरपंच भाऊसाहेब औटी, सरपंच बिपीन थिटे,बाबांचे चिरंजीव पोपट व आनंदा शंकर औटी, कांताराम दाते, उपाध्यक्ष नवनाथ रणपिसे, पत्रकार सतिष भाकरे,गोरक्षनाथ ईरोळे आदि यावेळी उपस्थित होते.
ReplyForward
|